
अभिजीत देशमुख, साम टीव्ही
Maharashtra Politics : कल्याण-डोंबिवली : लोकसभा विधानसभा निवडणूका झाल्या आता महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. डोंबिवलीत ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिंदे गटाने खिंडार पाडले आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटील या त्यांच्या समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत करताना दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. अनेक मातब्बर नगरसेवक,पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आज ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटील या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. संगीता पाटील या 2015 ते 2019 या कालावधीत केडीएमसीमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. संगीता पाटील त्यांच्यासह त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या घडामोडी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी शिंदे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही धक्का दिला. मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटाची वाट धरली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील टेंभी नाका येथे पक्षप्रवेश केला. एकीकडे आज शनिवारी ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज दुपारी कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.