TET Exam Scam Saam Tv
मुंबई/पुणे

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, बिहारमधून मुख्यसूत्रधाराला बेड्या

TET Paper Leak Case: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या ठोकण्यात आल्या. बिहारच्या पाटणामधून त्याला अटक करण्यात आली.

Priya More
  • टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला अटक

  • बिहारच्या पाटणामधून आरोपीला अटक करण्यात आली

  • भिवंडी पोलिसांनी महिनाभराच्या गुप्त शोधमोहीमेनंतर कारवाई केली

  • आरोपी पेपरफुटीचे मोठे सिंडिकेट चालवत असल्याचा पोलिसांचा दावा

अक्षय बडवे/ विकास काटे, साम टीव्ही

टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या ठोकण्यात भिवंडी पोलिसांना यश आले आहे. बिहारमधून ब्रिजेंद्र गुप्ताला अटक करण्यात आली. हा टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पेपरफुटीचे एक मोठं सिंडिकेट तो चालवत असल्याची माहिती उघड झाली आहे. ब्रिजेंद्र गुप्ताच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी देशभरातील अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. या प्रकरणात आधीच तिघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टीईटी परीक्षा गैरप्रकार प्रकरणात ठाणे पोलिस आयुक्तालय अंतर्गत भिवंडी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधील पटना येथे अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करत भिवंडी पोलिसांनी जेरबंद केलं. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून ब्रिजेंद्र गुप्ता फरार होता. त्याच्या शोधासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या भिवंडी पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि विविध राज्यांतील यंत्रणांशी समन्वय साधत शोधमोहीम राबवण्यात आली होती.

अखेर आरोपी बिहारमधील पाटणा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी महिनाभर सापळा रचला. अत्यंत फिल्मी आणि धाडसी पद्धतीने कारवाई करत बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आज सकाळी आरोपीला बिहारमधून पुणे विमानतळावर आणण्यात आले असून त्याला भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनच्या कार्यालयात नेण्यात येत आहे. टीईटी परीक्षा गैरप्रकार प्रकरणात यापूर्वीही काही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर महिनाभराच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

२८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज कुमार यांना आधीच अटक केली आहे. आता पर्यंत या गुन्ह्यात १२ जणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. २७ जून रोजी भिवंडी पोलिसांना पेपरफुटी प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर छापा टाकत या तिघांना ताब्यात घेतलं होतं. हे तिघे ही जणं दिल्लीतून ठाण्यात आले होते. त्यांच्याकडून टीईटी परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा संच देखील मिळून आला होता. या प्रकरणातला मुख्य आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: एका महिलेने 'हे' ७ पदार्थ खाणं बंद करुन ४० किलो वजन केले कमी, तुम्हीही रोज खाता का?

IAS तुकाराम मुढेंना राजकारणात यायचंय? FDAच्या आयुक्तांनीच दिलं उत्तर

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ; महायुतीत खळबळ

Sunday Horoscope: रविवारपासून बदलणार या 5 राशींचे नशीब! पैशांचा पाऊस, करिअरमध्ये मोठी झेप; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Ind vs SL : टीम इंडियाला जोरदार झटका; स्टार फलंदाज वेदनेनं विव्हळत मैदानाबाहेर गेला, चिंता वाढवणारा तो फोटो होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT