Dharavi Special Story Saam Tv
मुंबई/पुणे

Dharavi Special Story : धारावीत लोक रस्त्यावर का उतरले, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Dharavi News Today: धारावीत नेमकं काय घडलं. शेकडोच्या संख्येने लोक रस्त्यावर का उतरले होते, जाणून घेऊ हे संपूर्ण प्रकरण.

Satish Kengar

आज धारावीत सकाळपासूनच तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. शेकडोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, धारावी येथील मशिदीचे अनधिकृत बांधकाम पडण्यासाठी मुंबई महानगरपालिका येणार असल्याची माहिती कळतात दादा येथील मुस्लिम बांधव यांची मशिदीबाहेर मोठी गर्दी केली. यानंतर कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखून त्यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात तणाव आणखी वाढला होता.

मात्र स्थानिक राजकीय प्रतिनिधी आणि पोलिसांनी पुढाकार घेऊन वातावरण शांत केलं. यानंतर आता धारावीतील मशिदीच्या अवैध बांधकामावरील तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती देण्यात आलीये. मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचा स्थानिकांनी इशाराही दिलाय. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. तोडक कारवाईला स्थगिती मिळाल्याने सध्या तेथील तणाव निवळलाय.

धारावीत नेमकं काय झालं?

  • सकाळी 9 वा. धारावीतील मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी बीएमसीचं पथक दाखल.

  • सकाळी 9.15 वा. बीएमसी पथकाला स्थानिक रहिवाशांनी अडवलं.

  • सकाळी 9.25 वा. स्थानिक आक्रमक, जमावानं बीएमसी गाडीच्या काचाही फोडल्या.

  • सकाळी 9.40 वा. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, बंदोबस्त वाढवला.

  • सकाळी 10 वा. पोलिसांची स्थानिकांशी चर्चा, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

  • सकाळी 10.30 वा. वर्षा गायकवाड, अनिल देसाई धारावी पोलिस स्टेशनमध्ये दाखल.

  • दुपारी 12 वा. मशिदीतील अवैध बांधकामावरील कारवाईला 8 दिवसांची स्थगिती देण्यात आली.

  • दुपारी 12.15 वा. बीएमसीच्या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचा स्थानिकांचा निर्णय घेतला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''या संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहे. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात मागच्या वेळेलाही न्यायालयाने सांगितले होते. तेव्हाही बीएमसीने कारवाई सुरू केली होती. तेव्हा अशी विनंती करण्यात आली होती की, ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल.

ते म्हणाले, ''आज देखील बीएमसीची टीम त्या ठिकाणी गेली होती. तेव्हा त्यांनी (मशीद कमिटी) स्वतः सांगितले आहे की, पुढील चार-पाच दिवसात आम्ही अतिक्रमण काढतो. त्यामुळे टीम परत आली आहे. कुठल्याही परिस्थितीत लॉ अँडऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ नये. मला विश्वास आहे की, ज्याप्रमाणे त्यांनी (मशीद कमिटी) बीएमसीला लिहून दिले आहे. त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT