देवाचं दार उघडलं! मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतलं मुंबा देवीचं दर्शन... Saam Tv News
मुंबई/पुणे

देवाचं दार उघडलं! मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतलं मुंबा देवीचं दर्शन...

आजपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळं उघडण्यात आल्यानं राज्यात चैतन्याचं वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज मुंबईतील मुंबा देवीचे सपत्निक दर्शन घेतले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त काळ मंदीरांसह इतर सर्व धार्मिक स्थळं बंद होती. आज ७ ऑक्टोबर गुरुवारपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळं उघडण्यात आल्यानं राज्यात चैतन्याचं वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज मुंबईतील मुंबा देवीचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या. (Temples opened! CM prays to Mumba Devi with family

हे देखील पहा -

मुंबादेवी ही मुंबईची कुलदैवत आहे. मुंबा + आई = मुंबई. मुंबादेवीच्या नावावरुनच मुंबई हे नाव अस्तित्वात आल्यांचं बोललं जातं. यावेळी दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंदिराचे व्यवस्थापक आणि पुजाऱ्यांशी संवाद साधला. “आपली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत. माझी सर्व जनतेला आणि भक्तांना विनंती आहे, की आनंदात राहा, मात्र करोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भगव्या रंगाचा पारंपारिक कुर्ता परिधान केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गुरुवारी पहाटेच्या वेळी जाऊन दर्शन घेतले. तर राज्याचे परळी वैजनाथ या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही पहाटेच मंदिरात जाऊन मंदिराचे दरवाजे उघडत सर्व प्रथम दर्शन घेतले.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने हळूहळू सर्व गोष्टी पुर्वपदावर येत आहेत. राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु झाल्या होत्या. आज ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळं खुली होत आहेत. तसेच २२ ऑक्टोबरपासून सिनेमागृहेसुद्धा खुली करण्यात येणार आहे. मात्र या सगळ्या ठिकाणी कोरोनोचे नियम पाळणे, मास्क वापरणे, फिजीकल डिस्टन्स ठेवणे हे बंधनकारक आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT