पाकिस्तान मध्ये मोठा भूकंप, 20 लोकांचा मृत्यू तर अनेक जखमी

पाकिस्तानच्या हरनई भागात भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी आहे.
पाकिस्तान मध्ये मोठा भूकंप, 20 लोकांचा मृत्यू तर अनेक जखमी
पाकिस्तान मध्ये मोठा भूकंप, 20 लोकांचा मृत्यू तर अनेक जखमी Twitter/ @ANI

पाकिस्तानमध्ये आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6 असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान, किमान 20 लोकांचा मृत्यू आणि 300 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या दक्षिण भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचे झटके आज पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील हरनईच्या 14 किमी NNE वर जाणवले. यानंतरही हलके हादरे सतत जाणवत आहेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.

अनेक घरांचे नुकसान

अहवालानुसार, शक्तिशाली भूकंपाच्या हादऱ्यांमुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. भूकंपाची तीव्रता खूप मजबूत होती आणि जवळपासच्या अनेक जिल्ह्यात नुकसान झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तान मध्ये मोठा भूकंप, 20 लोकांचा मृत्यू तर अनेक जखमी
IPL 2021: 'उम्रान मलिक'ने फेकला या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू

याआधी 23 जूनला भुकंप

याआधी 23 जून 2021 रोजी इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीच्या मते, राजधानी इस्लामाबादच्या 146 किमी डब्ल्यूएसडब्ल्यूमध्ये संध्याकाळी 6.39 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 मोजण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com