Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : ती १५ वर्षांची, तो १९ वर्षांचा; लग्नाला कुटुंबाचा विरोध, प्रेमीयुगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेतली

Mumbai vikhroli News : विक्रोळी स्टेशनच्या परिसरात एक्सप्रेस ट्रेनसमोर प्रेमीयुगुलाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला कुटुंबियांनी विरोध केल्यामुळे दोघांनी टोकाचे पाऊल उचल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai News : मुंबईतील विक्रोळीमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. लग्नाला कुटुंबाने विरोध केल्यामुळे अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेससमोर उडी घेत आयुष्य संपवलेय. मुलाचे वय १९ तर मुलीचे वय १५ इतके असल्याचे समजतेय. रविवारी विक्रोळी स्थानकाजवळ ही धक्कादायक घटना घडली. लग्नास घरच्यांचा विरोध असल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विक्रोळी स्थानकाजवळ एक्सप्रेससमोर १५ वर्षांची मुलगी आणि १९ वर्षाच्या मुलाने जीव दिला. दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी टोकाचा निर्णय घेत आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आत्महत्येची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू करण्यात आलाय.

१५ वर्षांची मुलगी आणि १९ वर्षांच्या मुलाचे एकमेकांवर प्रेम जडलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते प्रेमात होते. दोघांना धूमधडाक्यात लग्न करून संसार थाटायचा होता. पण कुटुंबाने त्यांच्या लग्नाला नकार दिला. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे कुटुंबाचा विरोध होता. घरातून होणाऱ्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने टोकाचा निर्णय घङेतला. दोघांनी विक्रोळी रेल्वे स्टेशन परिसरात एका एक्सप्रेस ट्रेनच्या समोर उडी घेत आयुष्य संपवले.

१५ वर्षांच्या मुलीचा आणि १९ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांमध्ये लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबियांनी दोघांची समजूत काढायला हवी होती, अशी कुजबुज लोकांमध्ये सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : तरुणींच्या नृत्यात रंगला माहोल, पण अचानक स्टेज कोसळला अन्....; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Chintamani Aagman 2025 : भक्तांची चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीचा फर्स्ट लूक; पाहा फोटो

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

SCROLL FOR NEXT