
अभिजित देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी
Man Addicted to Online Rummy Turns Thief : सोलापूर ते कल्याण दरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांचे सात लाख रूपयांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने अटक केली आहे. योगेश चव्हाण असे या चोरट्याचे नाव आहे. योगेशला ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद होता. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती, त्यामुळे चोरीचा मार्ग पत्करल्याचे तपासात समोर आले आहे . योगेशने रमी खेळण्यासाठी सात लाखांचे दागिने पुण्यातील दोन ज्वेलर्सला विकल्याचे देखील तपासात उघड झाले. या दोन्ही ज्वेलर्सकडून योगेशने चोरी केलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. योगेशने याआधी आणखी काही चोऱ्या केल्यात का? याचा तपास पोलीस तपास करत आहेत.
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये राहुल सोनी नावाचा रेल्वे प्रवासी सोलापूर ते कल्याण दरम्यान प्रवास करत होते. दागिन्यांनी भरलेली बॅग राहुल यांनी आपल्या सीटवर ठेवली होती. त्यांना झोप लागली यादरम्यान पुणे स्टेशनला ट्रेन पुढे निघाल्यानंतर राहुल यांनी आपली बॅग तपासली. बॅगेत सोन्याचे दागिने नसल्याचे राहुलच्या लक्षात आले. दागिने चोरीला गेल्याने राहुल यांची झोप उडाली. कल्याण स्टेशन येताच त्यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार केली.
कल्याण जीआरपी पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत होते, सोबतच कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच देखील या प्रकरणाचा तपास करीत होते. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी तपास सुरू केला. रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी कल्याण ते पुणेपर्यंत सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चेक केले. पुणे रेल्वे स्थानकात एक तरुण स्टेशनवर फिरताना दिसून आला. सीसीटीव् मध्ये दिसणारा तरुणाची ओळख पटली योगेश चव्हाण याचे नाव होते. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी योगेश चव्हाण याला पुण्यातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी योगेशकडे विचारपूस केली. त्याने सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चोरी केल्याचे मान्य केले. रेल्वे पोलिसांनी योगेश यांनी चोरलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. पुढील तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. योगेश चव्हाण याला रमी खेळण्याच्या नाद आहे, या नादात तो कर्जबाजारी झाला. त्याला हा खेळ पुढेही खेळायचा होता. त्यासाठी त्याने ट्रेनमध्ये चोरी केली होती, राहुल यांनी अशा प्रकारे दोन चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे. सध्या रेल्वे क्राईम ब्रँच योगेशने याआधी किती चोऱ्या केले आहेत याचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.