Nashik : वाद टोकाला, नवऱ्यानं बायकोसमोरच आयुष्य संपवलं, नाशिकमध्ये खळबळ

Husband wife relationship case : नाशिकमध्ये कौटुंबिक वादामधून नवऱ्याने पत्नीसमोरच आयुष्य संपवले. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपासाला सुरूवात केली.
Nashik Man Ends Life After Family Dispute
Nashik Man Ends Life After Family Dispute
Published On

तबरेझ शेख, साम टीव्ही

Nashik News Update : संसार म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच. नवरा-बायकोमध्ये वाद होत राहतात. पण हा वाद कधी टोकाला जाईल, हे सांगता येत नाही. नाशिकमध्ये नवरा बायकोच्या वादाची धक्कादायक घटना घडली आहे. बायकोसोबत वाद झाल्यामुळे नवऱ्याने आयुष्याचा दोर कापलाय. रिक्षामध्ये जात असताना पत्नीसोबत झालेल्या वादातून नवऱ्याने टोकाची भूमिका घेतली. त्याने उड्डाणपुलावरून उडी घेत आयुष्य संपवले. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणाने चालत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली. तपोवन परिसरातील कन्नमार पुलावर त्या तरूणाने उडी घेत आयुष्य संपवले. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव चेतक पवार असे आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली.

Nashik Man Ends Life After Family Dispute
Pune : भोरमध्ये भीषण अपघात, ९ जणांना घेऊन जाणारी कार १०० फूट दरीत कोसळली

चेतक पवारने बायकोसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. चेतकच्या आत्महत्यानंतर त्याची पत्नी देखील उड्डाण पुलावरून खाली आली आणि रडायला लागली. घटना घडल्यानंतर येणारे जाणारे वाहांचालकाने गर्दी केली होती. ज्या रिक्षात बसून चेतक पत्नी सोबत प्रवास करत होता त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासानंतर मृत घोषीत केलं. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. चेतकने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहे.

Nashik Man Ends Life After Family Dispute
Maharashtra Politics : चूक दाखवा, राजीनामा नाही दिला तर २ बापाचा, लाडक्या बहि‍णींसमोर गोगावलेंचं चॅलेंज

पोलिसांकडून चेतकच्या आत्महत्याच तपास करण्यात येत आहे. कौटुंबिक वाद हेच कारण आहे, की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस घेत आहे. पोलिसांनी आज चेतकची पत्नी आणि कुटुंबियांना चौकशीसाठी बोलवले आहे. त्याशिवाय ज्या रिक्षातून चेतकने उडी घेतली, त्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलवलं आहे.

Nashik Man Ends Life After Family Dispute
Pune : दुर्देवी! राजगड उतरताना डोक्यात दगड पडला, १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू, पोलीस होण्याचे स्वप्न अधुरं

चेतक आणि त्याच्या पत्नी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणं सुरू होती. वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यावेळी चेतकने पत्नीला माघारी परत येण्यासाठी धमकी दिली होती. तू घरी परत आली नाही, तर आयुष्य संपवेल, अशी धमकी चेतकने दिली होती. पत्नी घरी परतल्यानंतरही चेतक याने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com