Pune : दुर्देवी! राजगड उतरताना डोक्यात दगड पडला, १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू, पोलीस होण्याचे स्वप्न अधुरं

Pune News Update : राजगडावर १८ वर्षीय तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला. गड उतरताना तरूणाच्या डोक्यात बुरूजाचा दगड पडल्यामुळे तो दगावला. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो पुण्यात आला होता.
Pune News Update
Pune News Update
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

Republic Day accident at Rajgad Fort : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पुण्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सुट्टी असल्यामुळे राजगडावर फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झालाय. रविवारी राजगडावर आठ हजारपेक्षा जास्त पर्यटकानी भेट दिली. यामधील एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. गड उतरत असताना बुरूजाचा दगड डोक्यात पडल्यामुळे १८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झालाय.

राजगडावर पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजगड किल्ल्यावर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. रविवारी, गडावर ८ हजाराहून अधिक पर्यटक होते. यातच फिरण्यासाठी आलेल्या अनिल विठ्ठल आवटे (वय १८) या पर्यटकाचा मृत्यू झाला. पाली दरवाजाजवळ गड उतरत असताना बुरुजाचा दगड डोक्यात पडून मृत्यु झाला.

Pune News Update
Pune GBS News : पुण्यात मेंदू व्हायरसचं थैमान सुरूच, जीबीएस रूग्णांची संख्या शंभरीपार, अनेकजण व्हेंटिलेटरवर

अनिल याच्या डोक्यावर दगड पडताच त्याच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी वेल्हे ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले होते. मात्र वेल्हे ग्रामीण रुग्णालयात अनिल त्‍यास मृत घोषित केले.

Pune News Update
Navi Mumbai : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून वाहतुकीत मोठा बदल, पुढील २५ दिवस रस्त्याचे काम चालणार

अनिल याच्या डोक्याला जबर जखम मार लागला होता तसेच कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.मयत अनिल आवटे हा खादगाव भाबट (ता. सेलू, जि. परभणी) येथील आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी धायरी येथे तो चुलत्याकडे राहत होता व धायरी येथेच पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी खासगी क्लासेसमध्ये तयारी करत होता. प्रजासत्ताक दिन असल्याने याच प्रशिक्षण संस्थेच्या इतर सहकाऱ्यांसमवेत अनिल हा राजगड किल्ला फिरण्यासाठी आला होता आणि डोक्यात दगड पडून त्याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास वेल्हे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com