Maharashtra Politics : चूक दाखवा, राजीनामा नाही दिला तर २ बापाचा, लाडक्या बहि‍णींसमोर गोगावलेंचं चॅलेंज

Raigad and Nashik guardian minister post dispute resolution : रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वात विकोपाला गेलाय. पालकमंत्रिपदावरून तटकरे आणि गोगावले आमनेसामने आले आहेत.
Raigad Guardian Minister Controversy
Raigad Guardian Minister Controversy
Published On

Raigad Guardian Minister Controversy : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. महायुतीकडून पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली, त्याला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विरोध दर्शवला. गोगावले समर्थकांनी रास्ता रोकोही केला. रायगडमधील पालकमंत्रिपदावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनामा देतो, असं वक्तव्य केले. भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना चॅलेंज देत मोठं विधान केलेय. आमची एक तरी चूक दाखवून द्या, असे थेट चॅलेंज गोगावलेंनी तटकरेंना केलेय.

रायगडचं पालकमंत्रिपद आणि महायुतीत गद्दारी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आव्हान प्रतिआव्हानाची भाषा सुरू असताना मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना आता थेट चॅलेंज केलंय. लोकसभा निवडणुकीत जर काही चुकीचं वागलो असेन तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो. राजीनामा नाही दिला तर मी दोन बापाचा असं भरत गोगावले सुनील तटकरे यांना चॅलेंज देत म्हटलेय. आमची एकतरी चूक त्यानी दाखवून द्यावी, असेही गोगावले म्हणालेत.

Raigad Guardian Minister Controversy
Maharashtra Politics : नाशिक-रायगडचा आज तिढा सुटणार, महायुतीची महत्त्वाची बैठक, कोण होणार पालकमंत्री?
ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आव्हान देतोय, खासदारकीच्या वेळी आमच्याकडून एक जरी चूक झालेली असेल, ती दाखवा. लाडक्या बहि‍णींच्या समोर सांगतो, मंत्रि‍पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा. हे माझं चॅलेंज. ते माझं चुकलं म्हणतात, त्यांनी एकतरी चूक दाखवून द्यावी.
मंत्री भरत गोगावले

रायगडचा तिढा आज सुटणार ?

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक आज होणार आहे. या बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. रायगडचे पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आले आहेत. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी तिन्ही पक्षातील नेते इच्छूक आहेत. दिग्गज नेत्यांच्या बैठकीत आज मार्ग निघण्याची शक्यता आहे.

Raigad Guardian Minister Controversy
Pune : दुर्देवी! राजगड उतरताना डोक्यात दगड पडला, १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू, पोलीस होण्याचे स्वप्न अधुरं

गोगावलेंचा विरोध, शिवसैनिकांचा रास्तारोको -

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर सध्या महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी या नियुक्तीला तीव्र विरोध दर्शवला. रायगडमध्ये आंदोलन आणि रास्ता रोकोही करण्यात आला होता.

Raigad Guardian Minister Controversy
Pune GBS News : पुण्यात मेंदू व्हायरसचं थैमान सुरूच, जीबीएस रूग्णांची संख्या शंभरीपार, अनेकजण व्हेंटिलेटरवर

जुनाच संघर्ष, आता तोडगा काय निघणार ?

शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचा नेता असावा, असे मत व्यक्त केले. तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष आधीपासूनचाच आहे. मागील सरकारमध्येही गोगावले यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद हवे होते, पण त्यावेळी त्यांना हुलकावणी मिळाली होती. आता त्यांना मंत्रिपद मिळाले, पण पालकमंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ते पुन्हा नाराज आहे. रायगडमधील पालकमंत्रिपदाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार आहे. या बैठकीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न होईल. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर कोणाची नेमणूक होईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. यावरून महायुती सरकारमधील राजकीय समीकरणे ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com