Eknath Shinde
Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांना विमानाने अमित शहांकडे नेणार?

अभिजीत सोनावणे

सुरत: राज्यसभा निवडणुकीनंतर (Election) विधान परिषद निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत उभी फूट पडल्याची दिसत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदार नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेंना भेटण्यासाठी सूरतला रवाना झाले आहेत, पण याअगोदरच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदारांना विमानाने अमित शहांकडे नेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हॉटेल ली मेरिडियन सुरत विमानतळाजवळ असल्याने शिंदें यांच्यासह आमदारांना विमानाने अमित शहांच्या भेटीला नेण्याची शक्यता आहे. संजय कुटे गेल्या २ तासांपासून ली मेरिडियन मध्ये आहेत, त्यांची आणि एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू आहे. तर शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर हे शिंदेंच्या भेटीला येण्याआधीच शिंदे आणि आमदारांना अमित शहांच्या भेटीला नेण्याची भाजपची खेळी असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

शिवसेनेने (Shivsena) एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेच्या (shivsena) सुमारे 17 आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. (Eknath Shinde Marathi news)

दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील (Gujarat BJP chief C R Patil) यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते.

एकीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव पाठवला आहे, तर दुसरीकडे शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे. शिवसेनेचे काही नेते सूरतला शिंदे यांना भेटण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे हे गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये तळ ठोकून असल्याचे समजते. हॉटेलमध्ये ते आहेत त्याच्या बाहेर मोठा पोलीस (police) बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनधिकृत व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Net Saree Tips: नेटची साडी धुताना घ्या 'या' गोष्टीची काळजी

PM मोदींना दिलासा; हायकोर्टाने निवडणूक बंदीची याचिका फेटाळली

Juggad Viral Video: गर्मीपासून वाचण्यासाठी अनोखा जुगाड! चक्क घराच्या छतावर बसवले कारंजे; VIDEO VIRAL

Viral Video: संपत्तीसाठी लेकाचे राक्षसी कृत्य! जन्मदात्याला लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण; वडिलांचा मृत्यू.. घटना CCTVत कैद

Girl Death While Dancing: हळदीत नाचता नाचता तरूणीचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT