Girl Death While Dancing: हळदीत नाचता नाचता तरूणीचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Viral Video News: लग्नाच्या कार्यक्रमात नाचत असताना एका तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Girl Death While Dancing
Girl Death While DancingSaam Tv

मेरठचा (Meerut) एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरूणी नाचताना दिसत आहे. ती अचानक खाली कोसळते आणि तिचा मृत्यू झालाय. ही घटना मेरठमधील असल्याची माहिती मिळत आहे. लिसाडी गेट भागात चुलत बहिणीच्या हळदी कार्यक्रमात नाचताना या तरूणीचा मृत्यू झाला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (Girl Death While Dancing) आहे. यामध्ये तरूणी डान्स करता करता जमिनीवर पडताना दिसत आहे. तरूणी जमिनीवर पडल्यानंतर कोणालाच काहीच समजलं नाही.

आकस्मिक मृत्यूबाबत अनेकवेळा प्रश्न उपस्थित होतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तरूणी डान्स करता करता जमिनीवर पडताना दिसत आहे. तरूणी जमिनीवर पडल्यानंतर कोणालाच काहीच समजलं नाही. व्हिडिओमध्ये दिसतंय की, लग्नाचं घर आहे. संपूर्ण आनंदाचं वातावरण आहे. आनंदाच्या वातावरणात सगळे नाचत (Girl Death While Dancing Video) आहेत.

तरूणी खाली पडल्यानंतर लोकांनी लगेच गाणं बंद (Viral news) केलंय. सगले त्या मुलीभोवती जमा झालेले आहेत. तरूणी बेशुद्ध झाली होती. यानंतर घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाला आहे. कुटुंबीयांनी तरूणीला तातडीने खासगी रुग्णालयात नेल्याची माहिती न्युज २४ हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे. तिथे डॉक्टरांनी तरूणीला तपासून मृत घोषित केलं (viral video) आहे. लगीनघरात या घटनेने मोठी शोककळा पसरली आहे. आनंदाचं वातावरण क्षणार्धात दु:खाच्या वातावरणात परिवर्तित झाली आहे.

Girl Death While Dancing
Viral Video: बाहेरुन झोपडी आतमध्ये महाल! तरुणीचं 'स्वप्नातलं घर' पाहून चक्रावून जालं; VIDEO तुफान व्हायरल

व्हिडिओमध्ये तरूणी तिच्या नातेवाईकांसोबत डान्स करत असल्याचं पाहायला मिळतय. स्पीकरच्या आवााजवर सगळे नाचत होती. या तरूणीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला होता. नाचत असताना तरूणीला अस्वस्थ वाटू (Girl Death Video) लागलं, त्यामुळे तिने एका मुलाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण ती जमिनीवर खाली पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. आपण सोशल मीडियावर लग्न असलेल्या घरचे अनेक व्हिडिओ बघतो, असाच हा एक धक्कादायक व्हिडिओ (Girl Dancing Video) आहे.

Girl Death While Dancing
Viral News: बायकोने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं, केली धो-धो धुलाई; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com