Delhi HC On PM Modi Plea: पंतप्रधान मोदींना दिलासा; हायकोर्टाने निवडणूक बंदीची याचिका फेटाळली

Prime Minister : पंतप्रधान मोदींवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
Delhi High Court PM Modi
Delhi High Court PM Modiyandex

प्रमोद जगताप, नवी दिल्ली

Delhi Hc Dismisses Plea To Disqualify Pm Modi From Elections : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. मोदींवर ६ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने निर्णय देत याचिका फेटाळलीय.

वकील आनंद जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली होती. पंतप्रधान मोदींवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात प्रकरण प्रलंबित असताना न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. निवडणूक आयोगाने याप्रकरणात लक्ष घालावं,असं उच्च न्यायालयाने याचिका सुनावणी करताना म्हटलंय.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार करताना धार्मिक भावना भडकावून भारतीय जनता पक्षाला (भाजप) मते मागत आहेत. यामुळे मोदी यांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाला (ECI) निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. पंतप्रधानांनी कथितपणे धार्मिक देवता आणि प्रार्थनास्थळांच्या नावावर मतांसाठी आवाहन केलं होतं.

परंतु ही याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. कोणत्याही तक्रारीवर विशिष्ट भूमिका घेण्यास ECI ला निर्देश देण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, असं न्यायालयाने आपला निर्णय देताना प्रतिपादन केलंय. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, पीएम मोदींनी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे दिलेल्या भाषणाचा उल्लेख करताना सांगितलं की, त्यांनी हिंदू देवता, हिंदू पूजास्थळे, तसेच शीख देवता आणि शीख प्रार्थनास्थळांच्या नावाने मतदारांना आवाहन करत मते मागितली होती.

Delhi High Court PM Modi
Narendra Modi: कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही; पंतप्रधान मोदी कडाडले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com