Juggad Viral Video: गर्मीपासून वाचण्यासाठी अनोखा जुगाड! चक्क घराच्या छतावर बसवले कारंजे; VIDEO VIRAL

Viral News: उन्हाळ्यात गर्मीच्या त्रासापासून नागरिक त्रस्त आहेत. यासाठी एकाने अनोखा जुगाड केला आहे. जेणेकरुन घरात गर्मी जाणवणार आहे. एका व्यक्तीने चक्क घराच्या छतावर कारंजे बसवले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Juggad Viral Video
Juggad Viral VideoSaam Tv

उन्हाळ्यात उकाड्याचा खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. देशात सध्या खूप जास्त तापमान आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे खूप जास्त अवघड आहे. उन्हापासून वाचण्यासाठी अनेक लोक घराबाहेर पडत नाही. दिवसभर एसी किवा कुलरसमोर बसून राहतात. तर अनेक लोक गर्मीपासून वाचण्यासाठी काही न काही जुगाड करतात. गर्मापासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे. त्या व्यक्तीने घराच्या छतावर पाण्याचे पाइप बसवले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका व्यक्तीने उष्णतेपासून वाचण्यासाठी घराच्या छतावर पाण्याचे पाइप बसवले आहे. या पाइपमधून कारंज्यासारखे पाणी येत आहे. हे पाणी घराच्या छतावर पडते. त्यामुळे घराचे छत थंड राहते आणि घरात थंडपणा जाणवतो. हे अगदी कारंज्यासारखे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओतील घर कौलारु आहे. कौलारु घरात सुर्यप्रकाश जास्त येतो. तसेच कौल लगेच गरम होतात. त्यामुळेच हा उत्तम जुगाड शोधून काढला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी केलेल्या या जुगाडचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Juggad Viral Video
Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

AdultSociety या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे, 'अरे यार हे खूपच भारी आहे. आम्ही पण तेच करतो'. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, 'भारतात काहीही होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण'.

Juggad Viral Video
Girl Death While Dancing: हळदीत नाचता नाचता तरूणीचा मृत्यू; धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com