Viral Video : उन्हाळ्यातला जुगाड! कारमध्ये स्विमिंगपूल बांधून तरुण निघाले पिकनीकला; व्हिडिओ व्हायरल

Car Convert in Swimming Pool : चार तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चारही तरुणांनी प्रवासात गरम होऊनये यासाठी जुगाड शोधला आहे.
Car Convert in Swimming Pool
Viral Video Saam tv

राज्यात बऱ्याच ठिकाणी उष्णतेचा पारा वाढत आहे. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी थंड पाणी पिने, एसी किंवा कुलर आणि फॅनचा वापर यासह सुती कपडे परिधान करणे अशा गोष्टी नागरिक करत आहेत. मात्र प्रवासामध्ये लागणाऱ्या उन्हापासून वाचण्यासाठी काय करावं हे अनेकांना समजत नाही.

Car Convert in Swimming Pool
Pune Weather Update: पुण्यामध्ये पुढचे ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान खात्याचा इशारा

अशात चार तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चारही तरुणांनी प्रवासात गरम होऊनये यासाठी जुगाड शोधला आहे. त्यांनी थेट आपल्या कारमध्ये स्विमिंगपूल बनवला आहे. तरुणांनी गरमीपासून बचाव व्हावा म्हणून जे काही डोकं लावलं आहे, ते पाहून सगळेच चकित झालेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणांचा एक ग्रुप बाहेर फिरण्यासाठी गेला आहे. बाहेर फिरण्यासाठी जाताना एसी कार असली तरी ऊन लागतंच. अशा ऊन्हापासून वाचण्यासाठी या तरुणांनी एक युक्ती शोधलीये. त्यांनी आपल्या कारला थेट स्विमिंगपूलमध्ये कनव्हर्ट केलं आहे. फक्त ड्रायव्हींग सीट ठेवून त्यांनी बाकीचे सीट काढून टाकले आहेत.

उरलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी एक निळ्या रंगाची पिशवी बांधली आहे. संपूर्ण कारमध्ये ही पिशवी बांधण्यात आलीये. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकण्यात आलं आहे. पाण्याच्या सहाय्याने तरुणांनी हा अफलातून स्विमिंगपूल बनवला आहे. आता यामध्ये सर्वांनी मज्जा मस्ती करत आणि भीजण्याचा आनंद घेत आपला कंटाळवाणा प्रवास पूर्ण केला आहे.

एवढंच नाही तर या सर्वांनी मिळून ड्रायव्हींग सीट जवळ देखील पाणी ओतलं आहे. त्यामुळे ड्रायव्हीग करणारा तरुण देखील पाण्याचा आनंद घेत एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर @armylosers या इस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Car Convert in Swimming Pool
Sambhajinagar Crime : संतापजनक..मूल होत नसल्याने विवाहितेच्या अंगावर मारले खिळे; दोघांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com