Pune Weather Update: पुण्यामध्ये पुढचे ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather Update: पुणे शहरात (Pune City) पुढील तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने (Weather Department) दिला आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Pune Rain
Pune Rain Pune News

सागर आव्हाड, पुणे

राज्यातली अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अवकाळी पाऊस जायचे नाव घेत नाहीये. अशामध्ये पुणे शहरात (Pune City) पुढील तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने (Weather Department) दिला आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

पुणे शहरात कमाल तापमानाचा पारा ३९.६ अंशांवर पोहचले आहे. तर किमान तापमान २१.७ अंश सेल्सिअसवर आहे. येत्या २४ ते २६ एप्रिल रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर, २७ ते २९ एप्रिलदरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. या दरम्यान कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार आहे.

कोल्हापूर -

कोल्हापूर शहरासह उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह आज मुसळधार पाऊस झाला. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे नारिकांची तारंबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण शहर परिसरात धुरळा उडाला. या पावसामुळे शेतपीकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अमरावती -

अमरावती शहरात रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. कडक ऊन्हानंतर रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. दिवसभर ऊन्हाचे चटके बसल्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि रिमझिम पाऊसाला सुरूवात झाली त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला.

गोंदिया -

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदियात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. यामुळे आंबा पिकासह फळभाजी आणि धान पिकाला देखील याचा मोठा फटका बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com