मुंबई - एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी (Ajay Choudhari) यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. अजय चौधरी हे दक्षिण मध्य मुंबईतील शिवडी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा पराभव केला होता. चौधरी हे 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी ४० हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते.
हे देखील पाहा -
अजय चौधरी हे शिवसेनेतील विश्वासू नेते मानले जात आहे.ते कट्टर शिवसैनिक आहेत. अजय चौधरी 2014 साली शिवसेनेतून विधानसभेवर निवडून आले. शिवसेने 2015 मध्ये त्यांच्याकडे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पद दिले. 2019 साली त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेने तिकीट दिले. 2019 साली विधानसभेवर निवडून आले.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (हे सेनेच्या सुमारे 17 आमदारांसह सूरतला गेल्याचे समजते. एकनाथ शिंदे हे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल आहेत. ते सूरत येथे असून ते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.