Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! ३ जणांवर तलवारीने सपासप वार, NCP नेत्याच्या पुतण्याला अटक

Mumbai Police: मुंबईतल्या मुलुंडमध्ये किरकोळ वादातून ३ तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तलवारीने तिघांवर सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याच्या पुतण्याला अटक करण्यात आली.

Priya More

Summary -

  • मुंबईतल्या मुलुंडमध्ये तिघांवर तलवारीने जीवघेणा हल्ला

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या पुतण्यासह दोन आरोपी अटकेत

  • पोलिसांकडून तपास सुरू

मयूर राणे, मुंबई

मुंबईमध्ये भररस्त्यात तिघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईत्या मुलुंडमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्याच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाने आपल्या मित्रांसह तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये रविवारी संध्याकाळी नशेत असलेल्या काही तरुणाने तलवारीच्या सहाय्याने ३ जणांवर सपासप वार केले. भररस्त्यात ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांवर मुलुंड येथील शासकीय रुग्णांमध्ये उपचार सुरू आहेत. सुलतान मलिकसह अन्य आरोपी यांनी नशेच्या आहारी जाऊन तिघांवर वार केल्याची माहिती भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी दोन आरोपींना ठाण्यातून अटक केली. या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे.

मुलुंड खिंडी पाडामध्ये राहणाऱ्या सुलतान मलिकने जुना राग मनात धरून सोहेल आणि त्याच्या मित्रांवर जीवघेणा हल्ला केला. तलवारीने त्याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ही माहिती मुलुंड पोलिसांना कळतात मुलुंड पोलिसांनी चार टीम या आरोपींना शोधण्यासाठी तयार केल्या. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी सुलतान मलिकसह मेहपाल देवाड या दोघांना ठाण्यातून पोलिसांनी अटक केली.

आरोपी सुलतान हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सजीव मलिक यांचा भाऊ युसूफ मलिकचा मुलगा आहे. नशेच्या आहारी जाऊन सुलतानने हे कृत्य केले. सुलतानचे काका सजीव मलिक यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती पण त्यांचा यामध्ये पराभव झाला होता. मुलुंडमध्ये भररस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित थरारामुळे नागरिक घाबरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambedkar Jayanti: आंबेडकर जंयतीला मुंबईत वाहतुकीत मोठा बदल, अनेक रस्ते बंद, वाचा पर्यायी मार्ग

Maharashtra News Live Update: जय पवारांच्या कृतीनं अजितदादांची आठवण; अजान सुरु होताच थांबवलं भाषण..

Turmeric- Milk Face Pack: चेहऱ्यावरच्या केसांसाठी हळद- दुधाचा फेस पॅक ठरेल फायदेशीर, कसा लावायचा? जाणून घ्या

एमपीएससी भरती प्रक्रियेत बदल, मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा?

काँग्रेसला मोठा धक्का! ऐननिवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT