Swargate Bus Depot Case Saam Tv
मुंबई/पुणे

Swargate bus depot: स्वारगेटप्रकरणातील मोठी अपडेट! तरूणीने इन कॅमेरा जबाब नोंदवला, पीडितेनं सांगितली सर्व आपबीती

Swargate bus depot Update Young Woman: पीडित तरूणीचा न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. तरूणीनं हा जबाब इन कॅमेरामध्ये नोंदवला आहे. ज्यात तिनं सविस्तर माहिती दिली.

Bhagyashree Kamble

स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्यातील वातावरण तापलं. या प्रकरणात दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे. दत्ता गाडेची चौकशी सुरू आहे.

अशातच पीडित तरूणीचाही न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. तरूणीनं हा जबाब इन कॅमेरामध्ये नोंदवला आहे. हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला असून, तरूणीसोबत २५ फेब्रुवारीला नेमका काय प्रकार घडला? हे तरूणीच्या जबाबात सविस्तर मांडण्यात आलंय.

या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांनी नुकताच जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच रूग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. डेपोच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली होती.

२६ वर्षीय तरूणीवर दत्ता गाडेनं लैंगिक अत्याचार केला होता. वाहक असल्याची बतावणी करून त्यानं तिला शिवशाही बसमध्ये नेलं. नंतर जबरदस्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार करून दत्ता गाडे पसार झाला. आरोपीला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली.

गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT