swargate alibag bus met with accident at khandala ghat saam tv
मुंबई/पुणे

Khandala Ghat : अंडा पॉईंटवर स्वारगेट अलिबाग बसला अपघात, प्रवासी सुखरुप

सुदैवाने या अपघातात एकही प्रवासी जखमी झालेले नाहीत अशी माहिती पाेलीसांनी दिली.

दिलीप कांबळे

Maval News :

स्वारगेटहून अलिबागला निघालेल्या बसचा (swargate alibag bus accident news) आज (गुरुवार) सकाळी खंडाळा घाटात अंडा पॉईंट (Anda Point) येथे अपघात झाला. प्राथमिक माहितीनूसार चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगार्‍यावर गेली. सुदैवाने या अपघातात काेणतीही जिवीत हानी झालेली नाही. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी : खंडाळा घाटात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग यांचा सामाईक पॉईंट असलेल्या अंडा पॉईंट येथे चालकाचा बसवरील ताबा सुटला.

त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गेली. सुदैवाने बस पलटी झाली नाही अन्यथा मोठी हानी झाली असती. या अपघातात प्रवासी जखमी झालेले नाहीत. ही बस स्वारगेटहून अलिबागाला चालली हाेती.

तळेगावातील तळ्यात मुंबईच्या युवकाचा मृत्यू

तळेगाव दाभाडे येथील तळ्यात पोहण्यासाठी काही तरुण पाण्यात उतरले होते. पोहत असताना एका युवकाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यात ताे बुडाला. या घटनेची माहिती मिळताच मावळ वन्यजीव रक्षक संस्था, अग्निशमन दल यांनी युवकाचा शाेध घेतला. परंतु त्याचा मृतदेह हाती लागला.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार आरमान अंकिलुर रहमान खान असे अठरा वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. ताे मुंबईतील रहिवासी आहे. अधिक तपास तळेगाव पोलिस करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT