Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: भ्रष्टाचाऱ्यांचं नाव, पण नितीन गडकरींना स्थान नाही... भाजपच्या उमेदवार यादीवरुन उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

Matrutirth To Shivtirth Yatra: सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवसेनेच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आज समारोप होत आहे. यानिमित्त शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि सर्व मुक्त संवादाचे सहभागी पदाधिकारी शिवतीर्थावर पोहोचले होते.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. ३ मार्च २०२४

Uddhav Thackeray Press Conference:

सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवसेनेच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आज समारोप होत आहे. यानिमित्त शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि सर्व मुक्त संवादाचे सहभागी पदाधिकारी शिवतीर्थावर पोहोचले होते. शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्यांची मातोश्रीवर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"सुषमा अंधारे आणि त्यांची टीम शेवटच्या माणसापासून सुरू केली आहे. जे काही यात्रेतून बाहेर आले हे जनतेसमोर आलं पाहिजे. सरकार जाहिरातबाजी करते. ५०००० घर दिल्याचा दावा करते ज्याने लोक भ्रमित होतात. सगळेच नाराज आहे. उद्योगपती शेतकरी कामगार सगळ्यांमध्ये असंतोष आहे. जनतेत गैरसमज पसरवला जातोय," असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

तसेच" एव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर जनतेत मोठा असंतोष निर्माण होईल. चंदिगढमध्ये त्यांनी तेच केलं. हिमाचलमध्ये देखील तेच केलं. काल भाजपने १९५ जणांची यादी जाहीर केली. अमित शहा आणि मोदीचं नावदेखील नव्हत. तेव्हापासून नितीन गडकरी यांचं नाव ऐकतोय पण त्यांचं नाव यादीत नव्हत. ज्यांनी एवढी काम केली एक्सप्रेसवेचे काम केलं, पण ज्यांच्यावर भ्रष्टाचारच आरोप केले त्यांची नाव आहेत. जुमलाचे नाव बदलून आता गॅरंटी झालं आहे," अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

"विद्यार्थ्यांना राज्यात नोकरी हवी आहे. सगळ्या औषधाच्या कंपन्या गुजरातला गेल्या आहेत. मात्र आपल्या मुलांना इथेच नोकरी करायची आहे. अनेक प्रश्न आहेत. नाशिकमध्ये कांदा उत्पादकांचा प्रश्न आहे. भारतातला सगळ्यात जास्त क्राईम रेट महाराष्ट्रात आहे. राज्यात कल्याणाचा क्राईम रेट सगळ्यात जास्त आहे. पोलीस यंत्रणेबद्दल लोक साशंक आहेत," अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी या यात्रेमध्ये आलेले अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT