Sunday Megablock On central Railway Mumbai saam tv
मुंबई/पुणे

Sunday Megablock : मध्य रेल्वेचा रविवारी कडकडीत मेगाब्लॉक! ट्रान्स हार्बरवर हालहाल होणार, कुठून कुठे अन् कसं असेल वेळापत्रक?

sunday mega block central railway mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय मार्गांवर येत्या रविवारी, ४ जानेवारी २०२६ रोजी मेगाब्लॉक घेतला आहे. या दरम्यान, लोकल गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. मुख्य मार्ग, तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक असेल.

Nandkumar Joshi

मध्य रेल्वे प्रशासनानं रविवारी ( ४ जानेवारी, २०२६) मुख्य, तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई विभागाच्या मुख्य मार्गावरील माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक नियोजित आहे. या कालावधीत लोकल गाड्या विलंबाने धावतील. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • कधी आणि कोणत्या मार्गावर असेल मेगाब्लॉक

  • मध्य रेल्वे मेगाब्लॉक - रविवार, ४ जानेवारी २०२६

  • कशासाठी? - विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे

  • मुख्य मार्ग -

  • माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी १५.३२ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

  • या लोकल शीव (सायन), कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील.

  • मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

  • या कालावधीत लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा निश्चित ठिकाणी पोहोचतील.

  • ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी १५.५१ वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावरून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

  • मुलुंड ते माटुंगा दरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर थांबतील.

  • माटुंगा स्थानकावरून गाड्या पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

  • गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ट्रान्स - हार्बर लाईन:

  • ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील लोकल सकाळी ११.१० ते संध्याकाळी १६.१० पर्यंत बंद राहतील.

  • ब्लॉक कालावधीत वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  • ठाणे येथून सकाळी १०.३५ ते १६.०७ वाजेदरम्यान वाशी / नेरूळ / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि

  • पनवेल / नेरूळ / वाशी येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा १०.२५ ते १६.०९ वाजेपर्यंत रद्द राहतील.

  • पायाभूत सुविधा राखण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी मेगाब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

एक व्हिडीओ, उमेदवारी गेली, भाजपकडून ट्रोल, माघारीनंतर रडारड

नॉयलॉन मांजा जीवावर उठला, पुण्यात पुलावर महिला गंभीर जखमी

महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा सक्तीची आहे; फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT