Bullet Train launch date : भारतात पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; तारीख केली जाहीर, ५ टप्पेही सांगितले

india first bullet train launch date : देशातील पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ ला सुरू होणार आहे. स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली.
या दिवशी धावणार पहिली बुलेट ट्रेन
mumbai ahmedabad bullet trainsaam tv
Published On

बुलेट ट्रेनमधून प्रवास करण्याचं भारतीयांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पहिली बुलेट ट्रेन सेवेत दाखल होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत गुरुवारी घोषणा केली. देशातील पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी सेवेत दाखल होईल, असे वैष्णव यांनी सांगितले.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिला टप्प्यातील सेवा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यानुसार, गुजरातमधील सूरतहून बिलिमोरा या दरम्यान १५ ऑगस्ट २०२७ रोजी बुलेट ट्रेन धावणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. सूरत-बिलिमोरा या मार्गावर सुरुवातीला बुलेट ट्रेन धावणार असून, दुसऱ्या टप्प्यात सूरत ते वापी दरम्यान बुलेट ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा मार्ग ५०८ किलोमीटरचा

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात सूरतपासून अहमदाबादपर्यंत सेवा सुरू होईल. चौथ्या टप्प्यात बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील ठाणे शहरापर्यंत, तर पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात अहमदाबाद-मुंबई या मार्गावर बुलेट ट्रेन धावेल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. दरम्यान देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्णपणे सुरू होण्यास काही वर्षे लागतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार, देशातील या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग ५०८ किलोमीटर लांबीचा असेल. त्यातील ३४८ किलोमीटर मार्ग हा गुजरातमध्ये, तर १५६ किलोमीटर मार्ग महाराष्ट्र, तर चार किलोमीटरचा मार्ग हा दादरा-नगर-हवेलीमधील असेल.

या दिवशी धावणार पहिली बुलेट ट्रेन
Tejas Vs Vande Bharat : वंदे भारत,तेजस, शताब्दी की गतिमान एक्सप्रेस; कोणत्या ट्रेनचं तिकीट सर्वाधिक? वाचा सविस्तर

बुलेट ट्रेन मार्गावर १२ स्थानके

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानके असतील. या मार्गावरील पहिलं स्थानक गुजरातमधील साबरमती असेल. तर अखेरचं स्थानक हे महाराष्ट्राची राजधानी मुंबई असणार आहे. गुजरातच्या साबरमतीनंतर पुढचं स्थानक अहमदाबाद असेल. अहमदाबादवरून निघालेली ट्रेन आणंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि शेवटी मुंबईला थांबेल. बुलेट ट्रेन ३२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल. ५०८ किलोमीटरचं अंतर अवघे २ तास ७ मिनिटांत पार करेल.

या दिवशी धावणार पहिली बुलेट ट्रेन
Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com