Success Story Saam Tv
मुंबई/पुणे

Success Story: डोबिंवलीतील १४ वर्षांच्या लेकाने नाव गाजवलं! खुल्या समुद्रात पोहण्याचा केला विक्रम, ४ तासात केलं २३ किमी अंतर पार

Success Story of Dombivli boy Aarav Ahuja: डोंबिवलीतील एका १४ वर्षीय मुलाने नवीन विक्रम केला आहे. त्याने रायगड येथील पिरवाडी बीच ते मुंबईतील ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान सुमारे २३ किलोमीटर अंतर पार केले आहे.

Siddhi Hande

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवलीतील पवार पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय मास्टर आरव आहुजा याने खुल्या समुद्रातील पोहण्यात उल्लेखनीय कामगिरी करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रायगड येथील पिरवाडी बीच ते मुंबईतील ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान सुमारे २३ किलोमीटर अंतराची एकल समुद्र पोहण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे.

आरवने अवघ्या ४ तास १४ मिनिटांत हा खडतर समुद्री प्रवास पूर्ण करत अपूर्व जिद्द, मानसिक ताकद आणि शारीरिक क्षमता दाखवून दिली. अरबी समुद्रातील उंच लाटा, जोरदार वारे आणि भरतीच्या आव्हानात्मक परिस्थितीतही त्याने आत्मविश्वासाने पोहणे सुरू ठेवत हे आव्हान यशस्वीरित्या पार केले.

आरव हा पलावा येथील ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरमध्ये कार्यरत रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून तो दररोज ३ ते ४ तास कठोर सराव करतो. विशेष म्हणजे, वयाच्या नवव्या वर्षी पोहण्यास सुरुवात करताना त्याला पाण्याची भीती वाटत होती. मात्र प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत आणि पालकांच्या प्रोत्साहनामुळे त्याने त्या भीतीवर मात करत खुल्या जलतरण क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले.

आरवने यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच कोची येथे झालेल्या ओपन नॅशनल स्विमॅथॉन स्पर्धेत त्याने १० किलोमीटर गटात रौप्यपदक पटकावले होते. तसेच पोरबंदर येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत १० किलोमीटर गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे. राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धांमध्येही त्याने अनेक पदके आणि गौरव मिळवले आहेत.

विशेष म्हणजे, ही आरवची पहिलीच एकल लांब पल्ल्याची समुद्रातील पोहण्याची मोहीम होती. त्यामुळे या यशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या मोहिमेदरम्यान शेवटच्या टप्प्यात डॉल्फिन माशांनी आरवच्या सोबत पोहत त्याच्या या यशात आणखी एक प्रेरणादायी आणि अविस्मरणीय क्षण निर्माण केला.

ही संपूर्ण मोहीम महाराष्ट्र राज्य हौशी जलक्रीडा संघटना यांच्या निरीक्षणाखाली पार पडली असून सर्व अधिकृत नियम, सुरक्षा निकष आणि प्रक्रियांचे काटेकोर पालन करण्यात आले.

आपल्या यशाबद्दल बोलताना आरवने आई-वडिलांचे सततच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल आभार मानले. तसेच प्रशिक्षक रुपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांच्या मार्गदर्शनाचे विशेष श्रेय दिले. संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दलही त्याने कृतज्ञता व्यक्त केली.

आरवने कराबी थायलंड ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेत २ किलोमीटर आणि ५०० मीटर गटात रौप्यपदके जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे.

आरवची ही ऐतिहासिक कामगिरी भारतातील खुल्या समुद्रातील जलतरण क्षेत्रात उदयास येणाऱ्या नव्या प्रतिभेची साक्ष देणारी असून देशातील युवा जलतरणपटूंना प्रेरणा देणारी ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: जिमशिवाय फिट राहायचं? रोज करा फक्त हा योग प्रकार

Coriander Juice Benefits: रिकाम्या पोटी कोथिंबीरचं पाणी प्यायल्याने पचनाच्या या ७ समस्या होतात गायब

पेट्रोल- डिझेल 3 रुपयांनी महागलं, महागाईनं गाठला 42 महिन्यांचा उच्चांक

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT