Leopard Attack : नातवाला वाचविण्यासाठी आजोबाची बिबट्याशी झुंज; हल्ल्यात चार वर्षीय मुलगा जखमी

Sangli News : गाडे मळा शेजारी असणाऱ्या पाचिरो पाडा येथे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेलेल्या आजोबांसोबत चार वर्षीय नातू देखील गेला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर हल्ला केला
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

सांगली : नागरी वस्त्यांमध्ये घुसून बिबट्यांचे होणारे हल्ले मागील काही दिवसात वाढले आहेत. अशात शिराळा तालुक्यात चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने नातवावर हल्ला केल्याचे पाहून आजोबांनी मोठे धाडस करून बिबट्याशी दोन हात करत बिबट्याच्या तावडीतून नातवाची सुटका केली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथे सदरची घटना घडली आहे. गिरजवडे येथील चार वर्षाच्या आरव मुळीक हा आजोबा सोबत शेतात गेलेला होता. यावेळी आरव याच्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. हे पाहून जवळच असलेल्या आजोबांनी न घाबरता मोठे धाडस करून बिबट्याच्या तावडीतून आपल्या नातवाला बचावले. तर मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leopard Attack
Sangli Crime : घरच्यांचा विरोध झुगारून वर्षभरापूर्वी प्रेमविवाह; काही महिन्यातच सासरच्यांचा छळ अन् घडलं भयंकर

झाडाआडून बिबट्याचा हल्ला 
बजरंग मुळीक हे आपला नातू आरव याला सोबत घेऊन गाडे मळा शेजारी असणाऱ्या पाचिरो पाडा येथे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी सोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक, राजेश्री मुळीक उपस्थित होते. दरम्यान त्यावेळी अचानक झाडाच्या आड लपलेल्या बिबट्याने आरव याच्यावर झडप घालून त्यास उसाच्या शेतात फरपटत नेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्वजण घाबरून गेले होते. 

Leopard Attack
Akola : धक्कादायक प्रकार; अकोला शासकीय रुग्णालय आवारातील लॉनवर अश्लील चाळे

बिबट्याच्या मागे जात केली सुटका 

त्यावेळी काशिनाथ मुळीक यांनी धावत जाऊन आरवची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. यात आरव याच्या मानेवर जखम झाली आहे. आजोबा बजरंग मुळीक आणि मोहन मुळीक यांनी त्यानंतर त्यास मोटरसायकलवरून उपचारांसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथे दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com