Akola : धक्कादायक प्रकार; अकोला शासकीय रुग्णालय आवारातील लॉनवर अश्लील चाळे

Government Hospital Akola: दिवसभरात शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात. गंभीर जखमी अवस्थेत असलेले रुग्ण दाखल केले असल्याने त्यांच्यासोबत नातेवाईक थांबलेला असतो. त्यांच्या विश्रांतीसाठी असलेल्या जागेवरच हे गैरप्रकार रात्री होत आहेत.
Akola Civil Hospital
Akola Civil HospitalSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असलेल्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालय परिसरात अश्लील चाळे सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय आवारात असलेल्या लॉन्सवर हे सुरु असून रुग्णांच्या नातेवाईकांसोबत गंभीर प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयातील समता लॉनमधील अश्लील चाळे करतांनाचा VIDEO समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

शासकीय रुग्णालय म्हटले म्हणजे याठिकाणी दिवसभरात शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. काही गंभीर जखमी अवस्थेत असलेले रुग्ण हे दाखल केले जात असल्याने त्यांच्यासोबत एक- दोन नातेवाईक थांबलेला असतो. मात्र या रुग्णालयाच्या आवारात गैरकृत्य सुरु असल्याचा प्रकार अकोला शासकीय रुग्णालयात समोर आला आहे. यामुळे या अश्लील कृत्याचा व्हिडिओ समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Akola Civil Hospital
Nandurbar : खाऊच्या पैशांनी पूराग्रस्तांना मदत; जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांचा पुढाकार, घरोघरी जाऊन मागितला निधी

नातेवाईकांच्या विश्रांतीच्या ठिकाणी गैरकृत्य 

अकोल्याच्या रुग्णालय परिसरात मागील काही दिवसांपासून अश्लील चाळे सुरु असल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच काही व्हिडीओ देखील वायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सामच्या हाती लागला असून सरकारी रुग्णालयातील समता लॉनच्या जागेवर रुग्ण व नातेवाईकांसाठी विश्रांती घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही समाजकंटकांनी गैरप्रकार सुरू केले आहेत. 

Akola Civil Hospital
Nashik : ग्रामपंचायत कराची रक्कम थकीत; रावळगाव शुगर चॉकलेट कारखाना सील

रुग्णवाहिकेतही अश्लील चाळे 
इतकंच नव्हे तर रुग्णालयाच्या परिसरात खाजगी ॲम्बुलन्समध्ये देखील अश्लील चाळे सुरु आहे. रात्री उभ्या असलेल्या खासगी ॲम्बुलन्समध्ये असेच प्रकार घडत आहेत. रुग्णालयाच्या आवारात अनेक खासगी ॲम्बुलन्स रात्री उभ्या असतात. काही जण या ॲम्बुलन्सचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोणतीच कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com