Nandurbar : खाऊच्या पैशांनी पूराग्रस्तांना मदत; जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांचा पुढाकार, घरोघरी जाऊन मागितला निधी

Nandurbar News : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परिवर्धा शाळेतील विद्यार्थ्यांनी मदत रॅली काढून घरोघरी जाऊन निधी मागितला. यातून चिमुकल्यांनी एकत्रित केलेल्या 5 हजार 162 रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्यात सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती. यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या पूरग्रस्तांना ठिकठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु आहे. यात विद्यार्थी देखील मागे राहिले नाहीत. नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशांची रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे. 

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने आतोनात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने पूरपरिस्थितीने उद्ध्वस्त झालेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांना मदतीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धे गावाने माणुसकीचे मोठे उदाहरण घालून दिले आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा, परिवर्धे येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ही मदत मोहीम राबवली. 

Nandurbar News
Thane Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; मुंबई महापालिकेकडून शहरात १० टक्के पाणी कपात

मुलांनी दिले खाऊचे पैसे 

पूरग्रस्तांना मदत म्हणून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात मदत रॅली काढून घरोघरी निधी गोळा केला. विशेष म्हणजे, या शाळकरी मुलांनी स्वतःच्या खाऊचे पैसे देखील मदत म्हणून दिले. या चिमुकल्यांच्या हाकेला परिवर्धेच्या ग्रामस्थांनी देखील मोठ्या मनाने साथ दिली. या सामूहिक प्रयत्नातून एकूण संपूर्ण गावातून ५ हजार १६२ इतका मदत निधी जमा झाला आहे. 

Nandurbar News
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; १४०० हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान

रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा

विद्यार्थ्यांचे दप्तर, शेती आणि संसारोपयोगी साहित्य गमावलेल्या पूरग्रस्तांसाठी हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील आणि शिक्षक- कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा निधी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्यातील संवेदनशीलता आणि उत्तम संस्कारांचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com