Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; १४०० हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान

Nandurbar News : आगामी सणासुदीत या पिकावरून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. परंतु आता शेतकरी डोळ्यांदेखत त्यांची मेहनत पाण्यात बुडाली आहे . कर्ज काढून उभा केलेले बाग जमीनदोस्त,शासनाने त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असून मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात १४०० हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा आकडा समोर आला आहे. यात प्रामुख्याने केळी, पपई, कापूस, सोयाबीन या पिकांच्या समावेश आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २८ गाव बाधित झाले आहेत. यात सर्वाधिक नुकसान नंदुरबार आणि शहादा तालुक्यात झाले असून शेती पिकांचे पंचनामे सुरू आहे. दरम्यान कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीत १४०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसामुळे उत्पादनात देखील मोठी घट होण्याची शक्यता आहे. 

Nandurbar News
Nandurbar : विद्यार्थ्यांचा 'पायी पायी पाढे’ उपक्रम; जंगलातून चार किमीचा प्रवास करत प्राण्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न

दिवाळीपूर्वी मदतीची मागणी 

दरम्यान नुकसानीचे लवकरात लवकर प्रशासनाच्या वतीने पंचनामे पूर्ण करून शासन दरबारी अहवाल सादर केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून दिवाळी अगोदर मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Nandurbar News
Thane Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; मुंबई महापालिकेकडून शहरात १० टक्के पाणी कपात

अतिवृष्टीने केळी बाग झाली आडवी
धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विश्वरूपा नदीला आलेल्या महापुरामुळे भांडगाव येथील प्रगत शेतकऱ्यांची केळीच्या बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे वादळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भांडगावमधील विजय चाबुकस्वार गुरव या शेतकऱ्याची आठ लाख रुपये खर्चून लावलेली केळीची भाग अक्षरश:भुईसपाट झाली. विश्वरूपा नदी दोन वेळा पात्रा बाहेर गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com