Pune School News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune School News : फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वर्गाबाहेर काढलं; पुण्यातील नामांकित शाळेतील प्रकार

Pune School News : शाळा व्यवस्थापनाने मुलांना वर्गाबाहेर ठेवल्याचे लक्षात येताच पालकांनी शाळेत जात जाब विचारला.

Prachee kulkarni

Pune News: शाळांची भरमसाठ वाढलेली फी अनेकदा पालकांच्या आवाक्याबाहेर जाते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांनी फी थकते. यावरुन शाळा व्यवस्थापन आणि पालकांचे खटके उडाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे.

पुण्यातल्या नामांकित शाळेत दहावीचे एक्स्ट्रा वर्ग आजपासून सुरू झाले. पण फी न भरल्याने पहिल्याच दिवशी शाळेतून मुलांना वर्गाबाहेर काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

शाळा व्यवस्थापनाने मुलांना वर्गाबाहेर ठेवल्याचे लक्षात येताच पालकांनी शाळेत जात जाब विचारला. स्थानिक राष्ट्रवादी नेते नितीन कदम यांनी देखील शाळेत जात व्यवस्थापनाला जाब विचारला. (Pune News)

जवळपास 150 मुलांना काढले बाहेर काढण्यात आले होते. यावेळी पालकांना शाळेत जात तेथील सुपरव्हायझर्सना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी आम्हाला वरुन जो आदेश आहे, त्याची आम्ही फक्त अमलबजावणी केल्याचं म्हटलं. यानंतर पालकांनी आणखी संताप व्यक्त केला. पालकांनी गोंधळ घातल्यावर शाळेने सामोपचाराची भूमिका घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss' फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव, वयाच्या १६व्या वर्षीच...

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

SCROLL FOR NEXT