Electricity Bill  Saam Tv
मुंबई/पुणे

...तर मीटर रिडींग एजन्सी आणि अधिकाऱ्यांवर होणार कारवाई, महाविरतण संचालकांचा इशारा

महावितरणकडून वीजमीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत, कारण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ग्राहकांना विजेच्या वापराप्रमाणेच (Electric Bill) अचूक बिल देणे, ही महावितरणची जबाबदारी आहे व त्यासाठी मीटर रीडिंग हा बिलिंगचा आत्मा आहे. महावितरणकडून वीजमीटरचे रीडिंग (Meter Reading) अचूक होण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना सुरु आहेत. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारींमध्ये मोठी घट देखील झाली आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी कायमस्वरुपी करण्यात यावी व मीटर रिडींगच्या अचूकतेसाठी कोणतीही हयगय करू नये. वारंवार सूचना देऊनही अचूक रिडिंगसाठी सुधारणा न झाल्यास मीटर रिडींग एजन्सी व जबाबदार (mseb action) अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे (Sanjay Taksande) यांनी मीटर रीडिंग संदर्भात घेतेलल्या आढावा बैठकीत दिला.

गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सूचना देऊनही मीटर रीडींगमधील अचूकतेसाठी सुधारणा न केल्याने विदर्भातील तीन मीटर रीडिंग एजन्सींना या बैठकीतच ताबडतोब महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले, तर संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या आढावा बैठकीत संचालक संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंग एजन्सींच्या संचालकांना अचूक बिलींगमधील त्यांची भूमिका व जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

संजय ताकसांडे यांनी सांगितले की, मीटर रीडिंगमध्ये अचूकता नसल्यास ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. यासोबतच महावितरणच्या महसूलाचे देखील नुकसान होते. हे प्रकार टाळण्याची प्राथमिक जबाबदारी मीटर रीडिंग एजन्सीजवर आहे. एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई हा मुख्य उद्देश नाही. परंतु वारंवार सूचना देऊनही रीडिंग एजन्सींच्या कामात सुधारणा होत नसेल तर मात्र कारवाई अटळ आहे. सोबतच जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीमध्ये एका सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रीडिंगमधील चुका,सदोष रीडिंग,मीटर नादुरुस्त असल्याबाबत चुकीचा शेरा आदींची माहिती देण्यात आली व त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध उपाय सांगण्यात आले.१०० टक्के अचूक मीटर रीडिंगसाठी ठरवून देण्यात उपाययोजनांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात यावी. त्यात कोणतीही हयगय करू नये. अचूक मीटर रीडिंगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. बिलिंगचे पर्यवेक्षण करावे.त्यातील अनियमितता टाळून वीजग्राहकांना योग्य व अचूक बिल देण्यात येईल याची सदोदित काळजी घ्यावी असे निर्देश संचालक ताकसांडे यांनी यावेळी दिले.

या बैठकीमध्ये कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी उपस्थित होते. मुख्य अभियंता संजय पाटील (देयके व महसूल), सुनील देशपांडे (चंद्रपूर), दिलीप दोडके (नागपूर), अनिल डोये (अकोला), पुष्पा चव्हाण (अमरावती), राजेश नाईक (गोंदिया), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार तसेच अधीक्षक अभियंते उपस्थित होते.तसेचव विदर्भातील सर्व कार्यकारी अभियंता व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT