मी सांगोल्याचा माजलेला रेडा, शिंगाट घातलं तर..., आमदार शहाजीबापूंचा राऊतांना इशारा

शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना धमकीवजा इशारा दिला
Shahajibapu Patil vs Sanjay Raut
Shahajibapu Patil vs Sanjay RautSaam Tv

सोलापूर : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी जाहीर सभेतून शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. शहाजी बापू सांगोल्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आपण सांगोल्याचा माजलेला रेडा असून खाली शिंगाट घातलं तर तुला असाच उभा करेल. अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना धमकीवजा इशारा दिला आहे. (Shahajibapu Patil vs Sanjay Raut)

Shahajibapu Patil vs Sanjay Raut
Sanjay Rathod | मातोश्रीचे दार पुन्हा उघडले, तर मी पुन्हा जाईल : संजय राठोड

शहाजीबापू हे शिवसेनेतून बंड पुकारून शिंदे गटात सामील झाले. बंडखोरी केल्यानंतर अखेर 15 दिवसांनी शहाजीबापू पाटील हे आपल्या मतदारसंघात परतले. सांगोल्यात गेल्यानंतर त्यांनी जाहीर सभेतून संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

शहाजीबापू यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “संजय राऊत… मी सांगोल्याचा माजलेला रेडा आहे, एक शिंगाट खाली घातलं तर तुला असाच उभा करेन, आमच्या नादाला लागू नको.” यावेळी त्यांनी भरसभेत संजय राऊतांची नक्कल देखील केली आहे.

Shahajibapu Patil vs Sanjay Raut
'मोदी हे शिंदे-फडणवीसांकडून मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे करून घेतील'

'संजय राऊत यांचं मनगट हे अंगठ्याएवढं आहे, आणि ते कापून काढू, प्रेतं आणू अशा धमक्या देतात. तुझं तुलाच चालता येईना, सकाळी बशीभर पोहे खातो, सायंकाळी चपाती खाऊन झोपते. ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची असते, शिकवतो. त्यानंतर अंगात रग येते. मनगटात ताकद येते. ज्यांच्या मनगटात ताकद असते, त्यांनीच बोलावं'. असंही शहाजी बापू म्हणाले.

पुढे बोलताना आमदार शहाजी बापू म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंमुळे संधी मिळाली आहे, म्हणून संजय राऊतांनी याचा गैरफायदा घेऊ नये. त्यांनी तातडीनं बोलणं बंद करावं, तरच उरलं-सुरलं ठाकरे घराणं राहीन, नाहीतर ठाकरे घराण्याला संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी उचलली आहे', असा आरोपही शहाजी बापू यांनी केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com