शिंदे सरकार येताच, आमदार भास्कर जाधव कुटुंबासह शेतीकामात व्यस्त

मुंबईतील विधानसभा विशेष अधिवेशन संपाताच शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) हे कोकणात कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Saam tv

रुपाली बडवे

चिपळूण : एकनाथ शिंदे सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर भाषण करताना भास्कर जाधव यांनी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली. शिवसेना (Shivsena) आमदारांची बंडखोरी शिवसैनिकांसहित भास्कर जाधव यांच्याही चांगलीच जिव्हारी लागली. त्यानंतर या बंडखोरीवर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात भास्कर जाधव हे बंडखोर आमदारांवर चांगलेच बरसले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षासाठी दोन पावले मागे येण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. मुंबईतील विधानसभा विशेष अधिवेशन संपाताच शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) हे कोकणात कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. (Bhaskar jadhav News In Marathi )

Bhaskar Jadhav
मी सांगोल्याचा माजलेला रेडा, शिंगाट घातलं तर..., आमदार शहाजीबापूंचा राऊतांना इशारा

शिवसेना नेते भास्कर जाधव हे गुहागरचे आमदार आहेत. मुंबईतील विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच भास्कर जाधव हे कोकणात परतले आहेत. जाधव हे चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत.

आमदार जाधव यांचं एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी,मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड करतात. त्यांचं कुटुंब दरवर्षी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य वर्षभर पुरवतात. समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली आहे. दरवर्षी न चुकता ते शेतातमध्ये उतरतात. मोठ्या उत्साहाने शेती करतात.

Bhaskar Jadhav
'माझ्यामुळं बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंना आमदार केलं, त्याचा आज पश्चाताप हाेताेय'

भास्कर जाधव हे पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाची घोटशीर तुटली होती आणि त्यानंतर काही दिवस ते चालू शकले नव्हते.परंतु, त्यावर त्यांनी मात केली. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना पहावयास मिळाले.

बंडखोर आमदार श्रीनिवास वणगा भात लावणीच्या कामात व्यस्त

सुरत - गुवाहाटी - गोवा भ्रमण करून सरकार स्थापन झाल्यावर शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वणगा यांनी आपल्या घरी आल्यावर शेतात उतरत थेट भात रोपणीला सुरुवात केली आहे . महाराष्ट्रात गेल्या बारा-तेरा दिवस राजकीय नाट्य सुरू होतं . यामध्ये एकनाथ शिंदे गटातील आमदार सुरत गुवाहाटी गोवा त्यानंतर मुंबईत परतले . मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यावर किमान पंढरवड्यानंतर सर्व आमदार आपापल्या घरी परतलेले आहेत . पालघरमध्ये सध्या भात रोपणीची काम सुरू असून आपल्या साधेपणा मुळे नेहमी चर्चेत असलेले आमदार श्रीनिवास वणगा यांनी स्वतः आपल्या शेतात उतरत रोपणीला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या आई देखील रोपणीच्या कामात वणगा यांना मदत करताना दिसून आल्या .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com