Dombivali Saam Tv News
मुंबई/पुणे

Dombivali: RSSच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक, लहान मुले प्रशिक्षण घेत असताना झाला हल्ला

Veer Savarkar Shakha stone pelting: डोंबिवलीतील चौधरी वाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली आहे. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Bhagyashree Kamble

डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डोंबिवलीतील चौधरी वाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली आहे. ९ मार्चला रात्रीच्या सुमारास ही दगडफेक करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस काही लहान मुले शाखेत प्रशिक्षण घेत होते. यादरम्यान अचानक काही अज्ञतांकडून वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली. यात सुदैवाने कुणी जखमी झाले नसून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील चौधरीवाडी मैदानावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर शाखेत काही लहान मुलांना प्रशिक्षण देण्यात येत होते. ९ मार्चला रात्रीच्या सुमारास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होते. या दरम्यान, काही अज्ञतांकडून दगडफेक करण्यात आली. जंगलातून आणि शेजारील इमारतीतून काही अज्ञतांनी दगडफेक केली होती.

दगडफेकीनंतर लहान मुले घाबरले होते. काही वेळ शाखेजवळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या दगडफेकीत सुदैवानं कुणीही जखमी झालेले नाही. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. ही शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची असून, शाखेचे अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार हे शाखेचं कामकाज पाहतात.

दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी; ११४९ रिक्त जागांवर भरती; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT