Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Pune News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात रस्त्याअभावी आजारी आज्जीला जावयाने खांद्यावर बसवून ५ किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात दाखल केले. डोंगराळ भागात रस्ता नसल्याने स्थानिक आदिवासींनी शासनाकडे रस्ते मागणीसाठी जोर धरला आहे.

Alisha Khedekar

  • भोर तालुक्यातील गावात रस्ता नसल्याने आजारी वृद्ध महिलेला जावयाने खांद्यावरून दवाखान्यात नेले.

  • ५ किलोमीटर डोंगर, पायवाट पार करत महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले.

  • गावकऱ्यांनी शासनाकडे अनेकदा रस्त्याची मागणी केली पण केवळ आश्वासने मिळाली.

  • आदिवासी पाड्यांना कायमस्वरूपी रस्ता मिळावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वरची धानवली गावातील आदिवासी पाड्यातील आजारी वृद्ध महिलेला, रस्त्याअभावी खांद्यावर बसवून उपचारासाठी नेण्याची वेळ आली आहे. बनाबाई नथू धानवले यांना जुलाब आणि ऊलट्या जास्त प्रमाणात झाल्याने, त्यांची प्रकृती गंभीर झाली होती परंतु रस्त्याची सोय नसल्यामुळे कोणतेही वाहन घरापर्यंत पोहचू शकत नसल्याने जावयाने या आजीला खांद्यावर घेऊन डोंगरावरचे अवघड चढ-उतार उतरत 5 किलोमीटरची पायपीट करून दवाखान्यात नेले.

बनाबाई यांची तब्येत बिघडल्याने जवळच्याच गावात राहणाऱ्या जावई सुरेश रामचंद्र वाघमारे यांनी सासरी धाव घेत, बनाबाई यांना थेट पाठीवर घेऊन अवघड पायावाट सर करत निघूडघर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखलं केले. भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात धानवली हे गावं वसलेले आहे.

गावातील आदिवासी पाड्याकडे जाणारा रस्ता कच्चा असल्यानं पावसाळ्यात वस्तीत कोणत्याही प्रकारचे वाहन जात नाही. त्यामुळे पक्का रस्ता नसल्यामुळे येथील आजारी, अबाल,वृद्धांना दवाखान्यात नेण्यासाठी अशाच प्रकारे खांद्यावर घेऊन किंवा झोळी करून घेऊन जावे लागत आहे.

रस्त्याबाबत वारंवार लोकप्रतीनीधी आणि शासनास लेखी तसेच तोंडी मागणी करूनही, त्यांच्याकडून नुसतेच आश्वासने मिळतं असल्याची खंत बोलून दाखवून स्थानिकांनी प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला आहे. या गावचे तात्काळ पुनर्वसन व्हावे किंवा या ठिकाणच्या दोनही आदीवासी पाड्यांना जाण्यासाठी कायमचा रस्ता व्हावा, अशी मागणी याठिकाणी राहणाऱ्या आदीवासी बांधवांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT