Railway Employee Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस, नेमका कुणाला आणि किती रुपये मिळणार? जाणून घ्या

Indian Railway Employee Bonus : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ₹१,८६६ कोटींच्या उत्पादकता लिंक्ड बोनसला मंजुरी दिली आहे. १०.९० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस मिळणार असून त्याची कमाल मर्यादा ₹१७,९५१ इतकी आहे.
Railway Employee Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस, नेमका कुणाला आणि किती रुपये मिळणार? जाणून घ्या
Railway Employee BonusSaam Tv
Published On
Summary
  • केंद्र सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.

  • बोनससाठी ₹१,८६६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • सुमारे १०.९० लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार असून कमाल मर्यादा ₹१७,९५१ इतकी आहे.

  • मात्र अद्यापही रेल्वे कर्मचारी संघटनांची बोनस वाढवण्याची आणि वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी कायम आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारने ₹१,८६६ कोटींच्या उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) ला मान्यता दिली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ७८ दिवसांच्या पगाराइतका हा बोनस देशभरातील १०.९० लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, यावर्षीचा बोनस कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि उत्पादकतेच्या आधारावर दिला जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे सणसमारंभ आनंदात घालवता येतील.

मिळालेल्या माहितीनुसार, हा बोनस अंदाजे १०.९० लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे . रेल्वेमध्ये विविध पदांवर काम करणारे कर्मचारी, ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, सुपरवायझर, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉइंटमेन, मिनिस्ट्रियल स्टाफ आणि इतर ग्रुप सी आणि डी कर्मचारी यांचा समावेश आहे. या वर्षी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस मिळणार आहे. ज्याची कमाल मर्यादा प्रति कर्मचारी ₹१७,९५१ असेल.

Railway Employee Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस, नेमका कुणाला आणि किती रुपये मिळणार? जाणून घ्या
Mumbra Railway Station : 'मुंब्रा' स्टेशनचे नाव अज्ञाताने अचानक बदलले, स्टेशनच्या फलकावर लावले दुसरे नाव

हा बोनस कर्मचाऱ्यांना आनंद देणारा असला तरी, रेल्वे कर्मचारी संघटना अजूनही सरकारशी काही मागण्यांवर चर्चा करत आहेत. इंडियन रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशन (IREF) आणि ऑल इंडिया रेल्वे एम्प्लॉईज फेडरेशन (AIRF) सारख्या प्रमुख संघटनांनी बोनस वाढवण्याची आणि आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची अधिसूचना जारी करण्याची मागणी केली आहे.

Railway Employee Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस, नेमका कुणाला आणि किती रुपये मिळणार? जाणून घ्या
Railway Diwali Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, बोनस कधी मिळणार? मोठी अपडेट

आयआरईएफचे राष्ट्रीय सरचिटणीस सर्वजीत सिंग यांनी सांगितले की, सध्या सहाव्या वेतन आयोगाच्या किमान वेतनाप्रमाणे ₹७,००० च्या आधारे बोनस दिला जात आहे, तर सातव्या वेतन आयोगाच्या किमान वेतन ₹१८,००० आहे. आणि हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे म्हटले. त्याचप्रमाणे, एआयआरएफ बोनस गणनेतून मासिक ₹७,००० ची मर्यादा काढून टाकण्याची आणि सध्याच्या वेतन रचनेनुसार वाढवण्याची मागणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com