Smita Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : नुसतं वारसदार म्हणून चालत नाही... स्मिता ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Smita Thackeray : मी अगदी जवळून पाहिले साहेबांना कुठलंही काम असेल तर एकनाथ शिंदेंना सांगा, होऊन जाईल असे म्हणत.

Chandrakant Jagtap

>> संजय गडदे

Smita Thackeray News : स्मिता ठाकरे यांनी आम्हाला असाच मुख्यमंत्री पाहिजे होता असे म्हणत एकनाथ शिंदे यांची स्तुती केली आहे. नुसतं वारसदार वारसदार करून चालत नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही वारसदार मग आम्ही कोण आहोत असे स्मिता ठाकरे म्हणाल्या.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिला आणि शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी स्मिता ठाकरे बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री आहेत, ते सतत काम करत असतात. झोप वेळ काळ काही नाही, फक्त काम त्यांच्या डोक्यात असतं. ते फक्त तीन तास झोपतात. त्यांचा दिवस इतक्या लवकर सुरू होतो आणि उशिरा संपतो. त्यांच्या कामामध्ये गती आहे, त्यामुळे ते सर्वांचे लाडके मुख्यमंत्री झाले आहेत असं म्हणत स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. (Latest Marathi News)

स्मिता ठाकरे म्हणाल्या, शिंदे एवढे उपक्रम हाती घेतात, महिलांसाठी काम करतात, बाल विकासासाठी काम करतात. हे काय खायची गोष्ट नाहीये. त्याला फक्त एक आवड लागते. एकनाथ शिंदे यांना आम्ही खूप वर्षापासून ओळखतो. हे त्यावेळचे एकनाथ शिंदे जेव्हा ते साहेबांचे शिलेदार म्हणून ओळखले जायचे. आनंद दिघे यांचे अनुयायी म्हणून ओळखले जायचे.

त्यांनी आज बारा बाय बाराच्या खोलीतून वर्षा वरचा जो प्रवास आहे तो काही साधा नाही. त्यामागे जे काही खडतर प्रयत्न आहे. त्यामुळे ते आज या खुर्चीवर आहेत आणि असाच मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे होता. नुसतं वारसदार वारसदार करून चालत नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (Latest Political News)

स्मिता ठाकरे म्हणल्या, शिंदे साहेबांनी तळागाळातून काम केलं. ते लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या शोधतात, त्याच्यावर उपाय करतात. आपल्या सहकाऱ्यांना कामाला लावतात आणि लोकांची काम झाली पाहिजे असं सांगतात. मी अगदी जवळून पाहिले साहेबांना कुठलंही काम असेल तर एकनाथ शिंदेंना सांगा, होऊन जाईल असे म्हणत. एकनाथ शिंदे हेच खंदे शिवसैनिक आहेत असेही स्मिता ठाकरे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : भगवान गणेशाची उपासना फलदायी ठरेल, अचानक धनलाभ होईल; ५ राशींच्या लोकाचं नशीब फळफळणार

Maharashtra Live News Update : - नाशिकच्या इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं राज्यस्तरीय शिबिर

Success Story: वडील वीट भट्टीवर कामाला; लेक २२ व्या वर्षी IPS झाला; सफीन हसन यांचा प्रेरणादायी प्रवास

Monday Horoscope Update : संकष्टी चतुर्थीची उपासना ४ राशींसाठी ठरणार लाभदायक, वाचा आजचे राशी

Plane Crash : मोठी बातमी! उड्डाणानंतर विमानाला आग अन् एअरपोर्टजवळ कोसळलं, १५ जणांचा मृत्यू | VIDEO

SCROLL FOR NEXT