Skywalk to be set up at Tiger Point for tourism development of Lonavla - Deputy Chief Minister Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: लोणावळ्याच्या पर्यटन विकासासाठी टायगर पाॅईंट येथे स्कायवॉक उभारणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Tiger Point Latest News: या परिसराला तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असून परिसराच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

दिलीप कांबळे

पुणे: मावळमधील लोणावळा (Lonavla) परिसरातील पर्यटन विकासासाठी टायगर पाॅईंट (Tiger Point) याठिकाणी स्कायवॉक (Skywalk) व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दिली. लोणावळा व खंडाळा ही जन्मजात पर्यटनस्थळे (Tourism Spot) असून मुंबई व गुजरातसह देशभरातील पर्यटक याठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. (Skywalk to be set up at Tiger Point for tourism development of Lonavla - Deputy Chief Minister Ajit Pawar)

हे देखील पहा -

भुशी धरण हे लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असून टायगर पाॅईंट हे बारमाही पर्यटनाचे केंद्र आहे. या पठारावरून कोकणचे विहगंम दृश्य पहायला मिळते. खोल दरी व सभोवतालचा परिसर मनमोहक असल्याने याठिकाणी पर्यटकांची सतत वर्दळ असते. याकरिता याठिकाणी पर्यटन वाढीसाठी व्हॅलीमध्ये स्कायवॉक व इतर पर्यटन सुविधा देण्याचा राज्य शासनाचा मानस असून अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासह मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावात संत जगनाडे महाराज यांचे समाधी स्थळ आहे. या परिसराला तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असून परिसराच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी या दोन्ही कामांना निधी मिळावा याकरिता पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नांचा हे यश आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT