तळेगावच्या तळ्यातील बेकायदा खोदकामाप्रकरणी कठोर कारवाई होणार - प्राजक्त तनपुरे

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक तळे उत्खनन अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आमदार शेळके सुमारे दीड वर्षे पाठपुरावा करीत होते.
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

दिलीप कांबळे

मावळ - तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये तळ्यातील माती, मुरुम, गौण खनिजाच्या बेकायदा खोदकामाप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू असून सुनावणीसाठी सूचनापत्र देण्यात आले आहेत. या प्रकरणी दोषी ठरणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanure) यांनी विधानसभेत केली.

मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी याप्रकरणी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक तळे उत्खनन अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आमदार शेळके सुमारे दीड वर्षे पाठपुरावा करीत होते. तळेगाव येथील देवराई संस्थेने बेकायदा उत्खनन करून गौण खनिजांची परस्पर विक्री करीत 79 कोटी 64 लक्ष रूपये 94 हजार रुपयांचा महसूल बुडवल्याच्या प्रकरणी स्वतः आमदार शेळके यांनी जुलै 2020 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.

हे देखील पहा -

उपविभागीय अधिकारी मावळ, कार्यकारी अभियंता जलसंधारण पुणे, तहसीलदार मावळ या अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून तब्बल सातशे पानांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

Maval News
विज वितरण कंपनीचा हलगर्जी; दोन शेतकऱ्यांचा ऊस जळुन खाक

मात्र अजून त्यावर अंतिम निर्णय न झाल्याने आमदार शेळके यांनी थेट विधानसभेत या विषयाला वाचा फोडली. शासन या प्रकरणी काय कार्यवाही करणार, किती दिवसात प्रकरण निकाली काढणार ? व कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांचा पैसा वसुल करणार का,असा सवाल यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com