Pune SIR Form Cyber Fraud: Senior Citizen Loses Rs 4.43 Lakh  AI
मुंबई/पुणे

SIR 2026 Fraud : SIR फॉर्ममध्ये चूक झाल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांचा गंडा; ४ लाख ४३ हजार रुपये लंपास

Pune SIR 2026 Fraud Case : पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक झाल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी कर्वेनगरमधील ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली. नागरिकांनी सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन.

Akshay Badve

  • पुण्यात SIR फॉर्मच्या नावाखाली सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

  • ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४ लाख ४३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक

  • मतदार यादीतील अर्जात चूक असल्याचे सांगून चोरट्यांनी घातला गंडा

  • अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. SIR फॉर्ममध्ये चूक झाली असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी कर्वेनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागरिकांनी एसआयआर फॉर्म किंवा मतदार यादीच्या नावाखाली फोनवरून माहिती मागणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार खासगी कंपनीतून निवृत्त झाले असून कर्वेनगर येथील नवसह्याद्री सोसायटीत राहतात. ३० जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असून, आपण भरलेल्या अर्जात चूक झाल्याचे सांगत त्यांनी एक मेसेज पाठवला.

यानंतर चोरट्यांनी सोशल मीडियावर तयार केलेला बनावट फॉर्म तक्रारदारांना पाठवला. हा फॉर्म भरण्यासाठी पाच रुपये शुल्क द्यावे लागेल, असे सांगून त्यांना एक एपीके फाइल पाठवण्यात आली. या फाइलमध्ये बँक खात्याची माहिती भरावी लागेल, असे सांगण्यात आले. चोरट्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी बँक खाते क्रमांकासह आवश्यक माहिती भरली.

त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा मिळवत बँक खात्यातून ४ लाख ४३ हजार रुपये काढून घेतले. ही रक्कम पुढे दुसऱ्या खात्यातही वळवण्यात आली. खात्यातून पैसे गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अलंकार पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू असून, पैसे ज्या बँक खात्यात वळवण्यात आले त्याची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT