Guru Paduka Darshan saam tv
मुंबई/पुणे

Paduka Darshan Sohla: टाळ-मृदंगांचा गजरात दिंडी निघाली, भक्तीच्या महाकुंभाला उत्साहात सुरूवात

Sakal Paduka Darshan Sohla: सकाळ माध्यम समूहाने भक्तीचा महाकुंभ सोहळा राबवला आहे. या सोहळ्यात तुम्हाला २१ संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'सकाळ माध्यम समूहा'ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याची उत्साहात सुरूवात झाली आहे. टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी निघाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली. एकाचवेळी २१ संत आणि सद्‌गुरूंच्या पादुकांचे दर्शन घडविणाऱ्या 'श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव'सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली. भक्तीमय वातावरण या सोहळ्याला सुरूवात झाली.

21 श्रीगुरूंच्या पादुकांसाठी वरळीच्या NSCI डोममध्ये आकर्षक मंदिरे साकारली जात आहेत. भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून वेगवेगळ्या सोयी-सुविधांनी 'भक्तीचा महाकुंभ' सज्ज झालेला आहे. आजपासून मुंबईत 'भक्तीचा महाकुंभ'सुरूवात झाला आहे. भारताला संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे. त्याचं दर्शन या भक्तीच्य महाकुंभात होत आहे. भक्तीच्या महाकुंभात एकाच छत्राखाली २१ श्रीगुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्याची भाविकांना मिळणार आहे. यासाठी भाविकांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही, फक्त नोंदणी करणं अनिवार्य आहे.

भाविकांना आध्यात्मिक आनंद आणि मनःशांतीची अनुभूती देणाऱ्या सोहळ्याला उदंड प्रतिसाद लाभला आहे. टाळ-मृदंगांचा गजर, अखंड हरिनामाचा जप, अभंगांचे सूर, दिंडी-रिंगणाने प्रसन्न झालेले वातावरण यामुळे या भक्तीसोहळ्याने वेगळीच उंची गाठली.

या संत व सद्‌गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी :

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज

संत मुक्ताई

संत नामदेव महाराज

संत जनाबाई

संत नरहरी सोनार

संत सेना महाराज

संत सावता माळी

संत एकनाथ महाराज

जगद्गुरू तुकाराम महाराज

संत निळोबाराय

महाअवतार बाबाजी

श्री स्वामी समर्थ

श्री साईबाबा

श्री गजानन महाराज

समर्थ रामदास स्वामी

टेंबे स्वामी महाराज

गोंदवलेकर महाराज

शंकर महाराज

गुळवणी महाराज

सद्गुरू गजानन महाराज

श्रीगुरू बालाजी तांबे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT