Nandurbar News: सातपुड्याच्या जंगलात वाघाची पूजा, नैवेद्यासाठी दारु, आदिवसींची शेकडो वर्षांपासूनची परंपरा

Nandurbar News: नंदुरबारमधील सातपुडा पर्वत रांगेत चक्क वाघाची पूजा केली जाते. वाघाने प्राणी, पक्षांना मारु नये, या भावनेतून ही पूजा केली जाते. गावात समृद्धी नांदावी म्हणून आदिवासी लोक ही पूजा करतात.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam Tv
Published On

सागर निकवाडे, साम टीव्ही प्रतिनिधी

नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील शहादा धडगाव घाटात चक्क वाघाची पूजा केली जाते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य झालं असेल पण हे खरं आहे. वाघाने गावशिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाड्यात समृद्धी नांदावी यासाठी पूर्वी आदिवासीं बांधवांचे पूर्वज हे जंगलात असलेल्या वाघाचे पूजन करायचे मात्र कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला असला तरी आज ही त्यांची पूजा केली जात असून हे देशातील एकमेव मंदिर आहे...

Nandurbar News
Officer Transfer: अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं रेट कार्ड; बदल्यांसाठी द्या 20 हजार ते 1 कोटी

वाघाची पूजा नेमकी का आणि कशी केली जाते?

जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात वाघ देव आणि आदिवासी बांधवांची कुलदैवत देवमोगरा मातेच मंदिर बांधले असून दरवर्षी दोन दिवसीय वाघदेव यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत असून या यात्रोत्सवात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. निसर्गाचा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणाऱ्या वाघाने गावशिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाड्यात समृद्धी नांदावी यासाठी वागदेवतेच पूजन केले जाते.

याहामोगी देवीच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातील देवमोगरा येथे रवाना होतात. वाग्देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि महू फुलाची दारू यांचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवल्यानंतर ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ होत असून पूजन करून करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आदिवासी बांधवांचे सुरु आहे.श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील देवबारा येथील मंदिराच्या परिसरात विविध सुविधांची वानवा असल्याने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी आहे.

Nandurbar News
Pune News: गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर, दिवसभर विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

आदिवासी बांधवांची श्रद्धा असलेल्या वाग्देव मंदिरात दरवर्षी शेकडो भाविक हजेरी लावतात. वाघदेवतेच ही देशातील एकमेव मंदिर असून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव नवस फेकण्यासाठी येत असता या स्थळाला स्थानिक महत्त्व मिळावं आणि या भागाचा विकास व्हावा अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे....

Nandurbar News
Nandurbar Hit and Run: वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला, फॉर्च्यूनरनं आई - मुलाला चिरडलं, नंदुरबारात हीट अँड रन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com