
सकाळ माध्यम समूहाने डिजिटल पत्रकारितेत आपल्या वेगळ्या ओळखीचा ठसा उमटवत २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. प्रिंट माध्यमापासून डिजिटल विश्वापर्यंत सकाळने सातत्याने प्रगती साधली आहे. दरम्यान, ई-सकाळने आणखी एक मोठं यश मिळवत आपल्या कामगिरीत नवा अध्याय जोडला आहे.
कॉमस्कोअरच्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये "ई-सकाळ" हे सर्वाधिक वाचलं जाणारं मराठी संकेतस्थळ ठरलं आहे. भारतातील डिजिटल क्रांतीमुळे प्रादेशिक भाषांमध्ये ऑनलाइन कंटेंटची मागणी प्रचंड वाढली आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे प्रादेशिक भाषांतील वाचकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
विशेषत: मराठीत ऑनलाइन वाचनाची आवड वाढली असून, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी वाचक "ई-सकाळ"ला प्राधान्य देत आहेत. "ई-सकाळ"ने आपल्या दर्जेदार आणि अचूक बातम्यांमुळे वाचकांची मनं जिंकली आहेत, त्यामुळेच ते महाराष्ट्रातील नंबर 1 मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म बनले आहे.
२६ जानेवारी २००० रोजी सुरू झालेले "ई-सकाळ" वेब पोर्टल आज २०२५ मध्येही आपली वेगळी ओळख राखून आहे. सकाळ माध्यम समूहाच्या या पोर्टलमध्ये "साम टीव्ही," "दैनिक गोमन्तक," आणि "ॲग्रोवन" या इतर वेब पोर्टल्सचाही समावेश आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना विविध श्रेणीतील दर्जेदार कंटेंट मिळतो.
साम टीव्ही : 'साम टीव्ही' या मराठी न्यूज चॅनेलने डिजिटल प्लॅटफॉर्मवरही दमदार ओळख निर्माण केली आहे. ब्रेकिंग न्यूज, सखोल विश्लेषण, डिजिटल व्हिडीओ आणि थेट प्रसारणाच्या माध्यमातून साम टीव्हीचे वेब पोर्टल प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहे, ज्यामुळे ते विश्वासार्ह डिजिटल माध्यम म्हणून ओळखले जाते.
गोमन्तक: 'गोमन्तक' हे सकाळ समूहाचं वेब पोर्टल गोव्याच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष केंद्रीत करतं. गोव्याच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि पर्यटनविषयक बातम्यांसाठी "गोमन्तक" वाचकांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाचं माध्यम ठरलं आहे.
ॲग्रोवन: 'ॲग्रोवन' पोर्टल शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती, हवामान अंदाज, कृषी तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन यांसारख्या विषयांवर नियमित आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देतं. शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह स्रोत ठरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.