Kandivali Firing Case Saam Tv
मुंबई/पुणे

Kandivali Firing Update: कांदिवली लालजीपाड्यात गोळीबार करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक, हत्येमागचं धक्कादायक कारण उघड

Kandivali Firing Accused Arrested: प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: कांदिवलीच्या लालजीपाडामध्ये एकाची गोळ्या (Kandivali Firing) झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Kandivali Police) उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) एकाला अटक केली आहे. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावला आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

रविवारी सकाळी कांदिवली पश्चिमच्या गणेश नगरमधील लालजी पाडा येथे गोळीबाराची घडना घडली होती. या गोळीबारात मनोजसिंग चौहान या 32 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. मनोजसिंगवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामधील एक गोळी त्याच्या डोक्याला लागली. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी कांदिवली पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरु केला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच आरोपीला अटक केली आहे.

कांदिवली पोलिसांच्या गुन्हे शाखेचा तपास पथकाने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. आरोपी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज रेल्वे स्थानकात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला मुंबईत आणले. रोहित पाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून रोहितने मनोजसिंगची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे.

मनोजसिंग हा इमिटेशन ज्वेलरीसाठी काम करायचा. ही गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारेच पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आहे. पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी सहा पथके तैनात केली होती. गोळीबारानंतर आरोपी उत्तर प्रदेशला पळून गेला होता. प्रयागराज रेल्वे स्थानकावर पोहचताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. कांदिवलीमध्ये गेल्या सहा महिन्यात गोळीबाराची ही दुसरी घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

Pune To Kolhapur: पुण्यापासून कोल्हापूरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग आणि पर्याय कोणते?

SCROLL FOR NEXT