Ketan Agarwal Case Saam Tv
मुंबई/पुणे

Ketan Agarwal Case: बालीला जाताना केतन-सिया यांच्यात कारमध्ये काय-काय घडलं? चालकाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Ketan Agarwal case Bali trip driver statement: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे सापडले आहेत. केतन आणि सिया यांच्या बाली ट्रीपदरम्यान काय-काय घडलं हे कारचालकाने सांगितले.

Priya More
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

  • बाली ट्रिपचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती

  • कारचालकाने केतन आणि सियामधील वादाबाबत माहिती दिली

  • सिया कारमध्ये बसण्यास तयार नव्हती पण तिचा भाऊ साहिलने तिला जबरदस्ती बसवले

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी केतन आणि सियाने बालीला जाताना ज्या कारमधून प्रवास केला होता त्या कारचालक वैभव जाधवची चौकशी केली. या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बालीला जाताना केतन आणि सिया या दोघांमध्ये नेमकं काय-काय घडलं होतं हे या चालकाने सांगितले. केतन आणि सियाने बालीमध्ये प्री-वेडिंग शूट केले होते.

जून महिन्याच्या ४ तारखेला सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे प्री -वेडिंग शुटसाठी बालीला जाणार होते. यासाठी त्यांनी पुण्यातून एक कार बुक केली होती. बालीला जाण्यासाठी सिया तयार नव्हती ती कारमध्ये सुद्धा बसायला तयार नव्हती म्हणून सियाचा भाऊ साहिलने तिला हाताला धरून जबरदस्ती कारमध्ये बसवले. यावर सिया आणि तिचा भाऊ साहिल यांची पुणे ते रावेत दरम्यान कारमध्ये वाद झाला होता.

किवळे भागातून ते केतन अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले. पुढे एक फूड कोर्टवर ते चहा नाष्ट्यासाठी थांबले. तेव्हा सिया कशाच्या तरी बहाण्याने पुन्हा कारकडे आली कारमधून काही सामान काढून तिने खिशात ठेवले. ही बाब कारच्या चालकाच्या निदर्शनात आली होती. पुढं जेव्हा चालकाने सर्वांना मुंबई एअरपोर्टवर सोडले तेव्हा पुन्हा काही वेळात केतनचा चालकाला फोन आला की 'माझा पासपोर्ट राहिला आहे.' दरम्यान सियाने पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला होता ही बाब कारचालकाच्या नजरेस आली होती.

दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज दुपारी पुणे ग्रामीण पोलिस दोघांनाही वडगाव मावळ कोर्टात हजर करणार आहेत. याप्रकरणी अजून काही तपास बाकी असल्याने पुणे ग्रामीण पोलिस दोन्ही आरोपीची पोलिस कोठडी वाढवून मागणार आहेत. रविवारीच पोलिसांनी दोघांनाही लोहगडावर नेत सीन रिक्रिएशन केले होते. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती या प्रकरणी अजून काही सबळ पुरावे लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT