Kalyan girl assault case Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: कल्याणमध्ये मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, आरोपीला बायकोनंच केली मदत

Kalyan girl assault case: कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला बुलडाण्यातून अटक करण्यात आली. तो त्याच्या पत्नीच्या घरात लपून बसला होता. त्याला कल्याणला आणण्यात येत आहे.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Girl Assault And Killed Case: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी एकाला ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी फरार होता. कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने बुलडाणा येथील शेगावमधून विशाल गवळीला बेड्या ठोकल्या.

विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या घरात लपून बसला होता. पोलिसांना बुलडाणा गाठून त्याला अटक केली. या घटनेमुळे कल्याण पूर्वमध्ये संतापाची लाट पसरली असून विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण पूर्वेतील नागरिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला.

२३ डिसेंबरला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. आईकडून २० रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. बराच कालावधी उलटून ही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर रोजी मुलीचा मृतदेह कल्याण नजीक बापगाव परिसरात सापडला. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांची ६ पथके तयार करण्यात आली. या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणातील दोन आरोपीची ओळख पटवली. त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी आणि त्याची पत्नी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशाल गवळीविरोधात याआधी देखील ४ विनयभंगाचे गुन्हे कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. विशाल गवळी हा विकृत स्वभावाचा असल्याचे समोर आले आहे. त्याने आतापर्यंत तीन लग्न केली असून सध्या तो तिसऱ्या बायकोबरोबर राहतो. पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत विशालच्या पत्नीने त्याला मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली.

पोलिसांनी कालपासूनच विशाल गवळीचा शोध सुरू करत त्याला बुलडाणा येथील शेगावमधून अटक केली. पोलिसांना चकवा देण्यासाठी विशाल दाढी काढून आपला लूक बदल असताना पोलिसांनी सलूनमधून त्याला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली रिक्षा देखील ताब्यात घेतली आहे. या रिक्षा चालकाचा गुन्ह्यात किती सहभाग आहे याबाबतची चौकशी सुरु असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

SCROLL FOR NEXT