Mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: धक्कादायक! अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार, २ मुलींचाही विनयभंग

woman blackmailed in malad : मालाडमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने महिलेवर बलात्कार करत तिच्या दोन अल्पवयीन मुलींचाही विनयभंग केला. या घटनेमुळे मालाडमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालाडमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून या पदाधिकाऱ्याकडून या महिलेवर बलात्कार सुरू होता. या महिलेच्या दोन मुलींचा देखील या पदाधिकाऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी मालाडमधील कुरार पोलिसांनी अविनाश शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड पूर्वेकडील कुरार परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेवर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला तर तिच्या दोन अल्पवयीन मुलींचाही आरोपीने विनयभंग केला. अविनाश शिंदे असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित महिलेने त्याच्याविरोधात कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाश शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला.

आरोपी हा महिलेच्या शेजारी राहत असून तो गेल्या तीन महिन्यांपासून पीडित महिलेवर बलात्कार करत होता. त्याने महिलेच्या १४ आणि ११ वर्षीय अल्पवयीन मुलींचाही विनयभंग केला. आरोपीने महिलेच्या घरामध्ये छुपा स्पाय कॅमेरा बसवून महिलेचे घरातील आंघोळ करतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित केले होते. महिलेला हाच व्हिडिओ दाखवून शारीरिक संबंध ठेवू न दिल्यास व्हायरल करण्याची धमकी देत होता.

गेल्या ३ महिन्यांपासून आरोपी या महिलेवर बलात्कार करत होता. महिलेने विरोध केल्यावर मुलींची सुपारी देऊन गायब करण्याची देखील आरोपी धमकी देत होता. अखेरीस आरोपीच्या जाचाला कंटाळून महिलेने कुरार पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कुरार पोलिसांनी आरोपी अविनाश शिंदे विरोधात बलात्कार, पोक्सो आणि विनयभंगाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT