Palghar Crime : रात्रीच्यावेळी वाहने अडवून लुटमार; गावात चोरी करताना अडकले सापळ्यात, चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

Palghar News : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शिरीष पाडा येथे टेम्पो चालक रात्री चहा पिण्यासाठी थांबला होता. याच दरम्यान दोन मोटारसायकली वरून चार अनोळखी इसाम त्या ठिकाणी आले
Palghar Crime
Palghar CrimeSaam tv
Published On

फैय्याज शेख 
वाडा (पालघर)
: सुमसाम रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांची लुटमान करण्यात येत असते. असाच काही प्रकार वाडा- भिवंडी महामार्गावर मागील काही दिवसांपासून सुरु होता. रात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहन चालकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून तसेच त्यांच्या वार करून पैसे, मोबाईल व महागडं वस्तूंची लुट करून पसार होत होते. या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले आहे. 

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शिरीष पाडा येथे टेम्पो चालक रात्री चहा पिण्यासाठी थांबला होता. याच दरम्यान दोन मोटारसायकली वरून चार अनोळखी इसाम त्या ठिकाणी आले. त्यांनी टेम्पो चालकास लोखंडी धारदार चाकूने टेम्पो चालकावर वार करत त्याच्याकडील मोबाईल व रोख पाच हजार रूपये घेऊन पसार झाले होते. तर मागील काही दिवसांमध्ये देखील असे प्रकार घडले होते. 

Palghar Crime
Beed : मुलीचा मृत्यू, एचआयव्हीची अफवा अन् कुटुंबाला वाळीत टाकले, आष्टीत धक्कादायक प्रकार

गावकऱ्यांच्या मदतीने दोघे सापडले 

दरम्यान टेम्पो चालकावर झालेल्या या हल्ल्याचा तपास सुरू असताना वाडा तालुक्यातील जांभुळपाडा येथून पहाटे पोलिसांना फोन आले कि जांभुळपाडा येथे चोर चोरी करून पळून जात आहे. यानंतर पोलिसांचे पथक लागलीच गावाकडे रावण झाले. तर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने सापळा रचत नितीन दशरथ रावते (वय २९), प्रकाश सुऱ्या मोरे (वय ३२) या दोघं चोरांना ताब्यात घेतले. मात्र त्याचे दोन साथीदार अघई शहापूरच्या रस्त्याने पळून गेले होते. 

Palghar Crime
Dhule Crime : धुळे हादरले; भर चौकात तरुणाचा खून, हेडफोन गिफ्ट देण्यावरून वाद विकोपाला

लूटमार केल्याची दिली कबुली 

यानंतर वाडा पोलिसांनी कसून चौकशी केली असता शिरिषपाडा येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या टेम्पो चालकाला लुटल्याची कबुली दिल्याने वाडा पोलिसांनी यांचे साथीदार असलेले सनी मोकाशी (वय २४, रा. वाडा, तुसे) व गणेश जाधव (वय १९,  रा.  कांदळी पडघा ता. भिवंडी) यांना शहापूर तालुक्यातून ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडून तीन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला सुरा ‌हस्तगत केले व मोटरसायकल देखील जप्त केली. यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वाडा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com