Navi Mumbai  Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : ६ वर्षांत आई-वडिलांना गमावलं, भावाचीही आत्महत्या; एकाकी पडला, नैराश्येतून इंजिनीअरनं स्वतःला ३ वर्षे फ्लॅटमध्ये कोंडून घेतलं

Navi Mumbai : नवी मुंबईत अनुप नायर यांनी आई-वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर ३ वर्षांहून अधिक काळ स्वतःला घरात बंदिस्त केलं होतं. पनवेलच्या रेस्क्यू सेंटरच्या मदतीने त्यांना बाहेर काढून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Alisha Khedekar

नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने स्वतःला ३ वर्षांपेक्षा जास्त काळ स्वतःच्या घरात बंदिस्त करून घेतले होते. अनुप नायर असं या व्यक्तीच नाव असून त्यांच्या आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून त्यानी स्वतःला कोंडून घेतलं होत. पनवेलच्या रेस्क्यू सेंटरला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अनुप यांना एकाकीपणातून बाहेर काढले आहे.

नवी मुंबईतील घरकुल सीएचएस सेक्टर २४ मध्ये ५५ वर्षीय अनुप नायर यांनी स्वतःला घरात ३ वर्षांपेक्षा अधिक काळ कोंडून घेतले. नायर यांची आई भारतीय हवाई दलाच्या दूरसंचार शाखेत कार्यरत होती, तर त्यांचे वडील व्हीपी कुट्टी कृष्णन नायर मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. त्यांचे आई वडील आणि भाऊ यांच्या मृत्यूनंतर अनुप नायर एकटेच राहत होते. अनुप नायर पेशाने इंजिनियर होते. मात्र आई वडील आणि भावाच्या मृत्यूनंतर ते एकटे पडले. या एकटेपणात त्यांनी स्वतःला जखडून ठेवले. नायर यांच्या शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ते क्वचितच दरवाजा उघडत होते. ते कचरा टाकायला सुद्धा बाहेर यायचे नाही. नायर जेवणासाठी ऑनलाईन ऑर्डर करून भुक भागवायचे. ते दिवसभर एका खुर्चीत बसून राहायचे आणि त्यावरच झोपायचे.

नायर यांच्या आईवडिलांचे ६ वर्षांपूर्वी निधन झाले तर त्यांच्या भावाने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले होते. या घटनेनंतर नायर स्वतःच घर सोडू शकले नाहीत. सोशल अँड इव्हँजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह ( SEAL ) यांना नायर यांच्या त्रासाबद्दल कळताच त्यांनी नायर यांचे घर गाठून त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले. आणि रेस्क्यू सेंटर मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

पनवेल सेंटरमधून बाहेर आल्यानंतर अनुप म्हणाले " माझा कोणताही मित्र नाही. माझे आई वडील आणि भाऊ आधीच वारले आहेत. माझ्या खराब प्रकृतीमुळे मला लगेच नोकरी मिळत नाही"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

SCROLL FOR NEXT