Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Surabhi Jayashree Jagdish

ब्रह्म मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त हा पहाटे ४ ते ५:३० या वेळेचा पवित्र काळ आहे. जो सनातन धर्मात खूप शुभ मानला जातो. आणि त्याला अक्षय मुहूर्त असंही म्हणतात.

आर्थिक स्थिती

ब्रह्म मुहूर्तात उठल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने समृद्धी येते.

गायत्री मंत्र

यावेळी आपल्या तळहातांकडे पाहून आपल्या देवाचे स्मरण करा आणि गायत्री मंत्राचा जप करा.

किती वेळा करावा?

ब्रह्म मुहूर्तात 'ओम भूर्भुवः स्वाह तत् सावितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्' या गायत्री मंत्राचा ११ किंवा १०८ वेळा जप करणे शुभ आहे.

भगवान शंकर

या वेळी भगवान शिवाचे ध्यान करताना 'ओम' मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि देवाचे आशीर्वाद मिळतात.

ध्यान आणि प्राणायम

या काळात ध्यान, प्राणायाम करा आणि माँ लक्ष्मीचा मंत्र 'ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः' चा जप करा.

काय टाळाल?

ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी खाणे, नकारात्मक विचार, कठोर शब्द आणि अनुचित कृती टाळा. यावेळी ब्रह्मचर्य पाळा आणि आळशी होऊ नका. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी या गोष्टी करू नका.

मानसिक शांतता

ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी पूजा आणि मंत्रांचा जप केल्याने मानसिक शांती, आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगती होते.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा