हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साप

साप म्हटलं की आपल्याला धडकी भरते. अशातच हरणटोळाचं नाव घेतलं की तो डोक्यावर चावतो हे आपल्याला माहितीये.

खरंच डोक्यावर चावा घेतो?

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

गैरसमज

मुळात हा एक गैरसमज आहे. ही एक दंतकथा असून हरणटोळ साप फक्त डोक्यावरच चावा घेतो असे नाही.

झाडांवर राहतो

हरणटोळ हा प्रामुख्याने झाडांवर राहतो आणि त्याच्या हिरव्या रंगामुळे पानांमध्ये तो सहज लपून जातो.

का चावतो?

हरणटोळ हा देखील इतर सापांप्रमाणे स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा त्याला धोका वाटल्यास चावा घेतो.

निम-विषारी साप

हरणटोळ हा निम विषारी साप मानला जातो.

का आहे गैरसमज?

हा साप झाडांवर असल्याने एखादी व्यक्ती त्याच्याजवळून जात असताना तो डोक्याच्या किंवा खांद्याच्या उंचीवर असतो. अशावेळी तो डोक्याच्य बाजूला चावा घेऊ शकतो यामुळे तो 'डोक्यावर चावला' असा समज रूढ झाला असावा.

दंतकथा

अनेक सापांबद्दल समाजात विविध दंतकथा असून त्यापैकीच हा एक गैरसमज असू शकतो. मुळात याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

इथे क्लिक करा